सनटेक रिअल्टी तर्फे शहाड (कल्याण) येथे १० दशलक्ष चौरस फूट जागेचा विकास करण्यासाठी JDA चे नियोजन

या प्रकल्पातून पुढील 7 ते 8 वर्षांत 9,000 कोटी रुपयांची उत्पन्न निर्मिती होईल असा अंदाज असून त्यामुळे कंपनीचा ताळेबंद व रोखीचा प्रवाह मजबूत होईल. एमएमआरच्या (MMR) पश्चिम उपनगरांत सनटेक रिअल्टीचा पोर्टफोलिओ अतिशय दमदार असून हा प्रकल्प समाविष्ट झाल्यानंतर एमएमआरच्या पूर्व बाजारपेठांमध्येही कंपनीचा पोर्टफोलिओ बळकट होईल.

  • संभाव्य उत्पन्न क्षमता अंदाजे 9,000 कोटी रुपये
  • 50 एकरांच्या या प्रकल्पात अंदाजे 1 कोटी चौरस फूटचा (10 दशलक्ष चौरस फूट) विकास करणार
  • पुढील 7- 8 वर्षांत अंदाजे 9,000 कोटी रुपयांची उत्पन्न निर्मिती
  • महत्त्वाकांक्षी आलिशान जीवनशैलीसह प्रीमियम निवासी सुविधांचा विकास

मुंबई : सनटेक रिअल्टी लिमिटेड (Sunteck Realty Ltd) या बीएसई व एनएसईवर नोंदणीकृत मुंबईतील प्रीमियम प्रॉपटी डेव्हलपरने शहाड (कल्याण) येथे 50 एकरांच्या जमिनीचा विकास करण्याची योजना आखली आहे. कंपनी या ठिकाणी अमर डाय केम लिमिटेडसह असेट लाइट जेडीए मॉडेलअंतर्गत महत्त्वाकांक्षी आलिशान सुविधांचा समावेश असलेले निवासी संकुल (Residential Complex) उभारणार आहे. कंपनीसाठी हे आणखी एक असामान्य संपादन असून त्यामुळे मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील (एमएमआर) पूर्व उपनगरांतील कंपनीचे अस्तित्व प्रस्थापित होणार आहे.

या प्रकल्पातून पुढील 7 ते 8 वर्षांत 9,000 कोटी रुपयांची उत्पन्न निर्मिती होईल असा अंदाज असून त्यामुळे कंपनीचा ताळेबंद व रोखीचा प्रवाह मजबूत होईल. एमएमआरच्या (MMR) पश्चिम उपनगरांत सनटेक रिअल्टीचा पोर्टफोलिओ अतिशय दमदार असून हा प्रकल्प समाविष्ट झाल्यानंतर एमएमआरच्या पूर्व बाजारपेठांमध्येही कंपनीचा पोर्टफोलिओ बळकट होईल.

2020 मध्ये कोविड-19ची पहिली लाट आल्यापासून सनटेक एमएमआरमधील सर्वोच्च मूल्य असलेल्या प्रकल्पांची सर्वात मोठी अधिग्राहक ठरली असून हा ट्रेंड आजही कायम आहे. किंबहुना कंपनीने दुसऱ्या लाटेनंतर संपादनाला लक्षणीय चालना दिली आहे. कोविड- 10 महामारी आल्यापासून कंपनीचे हे चौथे संपादन आहे. शहाड (कल्याण) प्रकल्पापूर्वी कंपनीने वसई, वसिंद आणि बोरिवली येथे तीन प्रकल्पांचे संपादन केले असून त्यांच्या एकूण 8 दशलक्ष चौरस फुटांच्या जागेत आता 10 दशलक्ष चौरस फुटांची भर पडून सनटेकचा पोर्टफोलिओ 18 दशलक्ष चौरस फुटांवर गेला आहे.

‘अमर डाय केम लिमिटेडबरोबरचा हा उच्च मूल्यवर्धित संयुक्त विकास प्रकल्प जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. महामारीनंतर दिसून आलेल्या ट्रेंडशी सुसंगत प्रमुख शहरांजवळच्या परिसरात चांगल्या ठिकाणांना मागणी आहे. एमएमआरच्या वेगाने विकसित होत असलेल्या पूर्वेकडच्या शहाडच्या लघु- बाजारपेठेत प्रवेश जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. दर्जा आणि दमदार निधी असलेल्या स्थावर मालमत्ता कंपन्यांच्या बाजूने बाजारपेठ एकत्रीकरण होण्याचा ट्रेंड सध्या असून सनटेकला या ट्रेंडचा लाभ झाला आहे. कंपनी सातत्याने आकर्षक परताव्यांच्या संधीसह व्यवसाय पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. आम्ही सर्वोत्तम बांधकाम आणि विकास क्षमतांचा वापर करून या लघु बाजारपेठेत लँडमार्क विकसित करू,’ असे सनटेक रिअल्टी लिमिटेडचे अध्यक्ष कमाल खेतान म्हणाले.