शॅडोफॅक्सद्वारे बिग मनी विकेंडचा शुभारंभ!

दळणवळणाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत क्राउडसोर्स्ड थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स सेवा पुरविणारा भारताचा सर्वात मोठा वाहतूक मंच शॅडोफॅक्स टेक्नोलॉजीज आपल्या बहुप्रतिक्षित बिग मनी विकेंडच्या शुभारंभासाठी सज्ज झाला आहे. कंपनीच्या भारतभरातील २५ शहरांमध्ये कार्यरत डिलिव्हरी पार्टनर्सवर लक्ष केंद्रित करणा-या या उपक्रमाची रचना या पार्टनर्सना उत्पन्नप्राप्तीची संधी देण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. यात सहभागी होणा-या डिलिव्हरी पार्टनर्सना एक टेलिव्हिजन, एक रेफ्रिजरेटर आणि एक मारुती आल्टो यांसह पाच लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

    मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन जवळ आला असताना शॅडोफॅक्सकडून आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सबरोबर संवाद वाढविण्याच्या, नवीन पार्टनर्सना सामावून घेण्याच्या, विद्यमान पार्टनर्सना टिकवून ठेवण्याच्या आणि निष्क्रीय पार्टनर्सना आकर्षित करण्याच्या हेतूने बिग मनी विकेंडचे आयोजन केले जात आहे. ही तीन दिवसांची मोहीम ५ ते ७ ऑगस्ट २०२२ दरम्यान सुरू राहील आणि या काळात डिलिव्हरी पार्टनर्सना आकर्षक लाभांशांसह आपल्या उत्पन्नामध्ये जास्तीत-जास्त भर टाकण्याची संधी मिळेल.

    बिग मनी डे २.० मध्ये डिलिव्हरी पार्टनर्सनी एका दिवसात ३,६०० हून अधिक रुपयांची कमाई केली होती व या काळात दर दिवशी २ लाखांपर्यंतच्या ऑर्डर्स दाखल झाल्या होत्या. अत्यंत यशस्वी ठरलेल्या या मोहिमेमध्ये दैनंदिन सक्रिय यूजर्सच्या संख्येत बिग मनी डे १.० च्या तुलनेत ५५ टक्‍के वाढ नोंदवली गेली होती. बिग मनी डेच्या याआधीच्या पर्वामध्ये २५ डिसेंबरसाठी सुमारे ४९.७ हजार स्लॉट्स बुक झाले होते तर ३१ डिसेंबरसाठी ५३ हजार स्लॉट्स बुक झाले होते. बिग मनी विकेंडच्या अधिक भव्य आणि सरस अशा या नव्या पर्वामध्ये ब्रॅण्डच्या वाढीला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

    शॅडोफॅक्स टेक्नोलॉजीजचे सह-संस्थापक आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख प्रहर्ष चंद्रा म्हणाले, “शॅडोफॅक्स टेक्नोलॉजीजमध्ये आम्ही आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सना सोबत घेऊन आपला विकास साधत असतो. आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सना कमाईचे अधिक चांगले पर्याय देऊ करणे आणि मारुती आल्टोसह ५ लाख रुपयांपर्यंतच्या किंमतीचे आकर्षक इनाम जिंकण्याची संधी देणे हा बिग मनी विकेंडचा व्यापक हेतू आहे.”

    ते पुढे म्हणाले, “या मोहिमेच्या पहिल्या दोन पर्वांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि येत्या बिग मनी विकेंडसाठीही आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. यावेळी या उपक्रमामध्ये अधिक व्यापक प्रतिसाद मिळेल आणि आमच्या सर्व रायडर्ससाठी हा एक आनंददायी दिवस ठरेल अशी आमची अपेक्षा आहे.”

    देशभरातील डिलिव्हरी पार्टनर्सना आपापल्या अॅपवर लॉगइन करून या उपक्रमाची ताजी माहिती मिळवता येईल व आपल्या भागामध्ये लागू ऑफर्सविषयी जाणून घेता येईल. ज्यांना अजूनही शॅडोफॅक्स रायडर्स कम्युनिटीचा भाग बनण्याची इच्छा असेल अशा व्यक्तींना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करून घेता येईल आणि अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी मिळविता येईल.