गुगल पे किंवा फोन पे यासारख्या थर्ड पार्टी अपद्वारे पेमेंट करण्यास येणार मर्यादा

    यूपीआय डिजिटल पाइपलाइन चालवणारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची सध्या एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा सुरु आहे. यूपीआयद्वारे  केल्या जाणाऱ्या पेमेंटवर आता व्हॉलूम कॅप बसवण्यात येणार आहे. या व्हॉल्यूम कॅपनुसार आता यूपीआद्वारे म्हणजेच गुगल पे किंवा फोनपे सारख्या थर्ड पार्टी अपद्वारे पेमेंट करायचे असल्यास त्याची मर्यादा ठरवल्या जाणार आहे. म्हणजे दिवसाला प्रत्येक गुगल पे किंवा फोन पे धारकांना या अप्सद्वारे एका ठरवलेल्या किंमती प्रमाणे मर्यादित पेमेंट करता येणार आहे. तरी आरबीआय कडून येत्या ३० नोव्हेंबर पासून व्हॉलूम कॅपचा निर्णय लागू करण्यात येणार होता. पण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा निर्णय पुढे ठकलण्याची मागणी केली आहे. म्हणजेचं ३० नोव्हेंबर ऐवजी ३१ डिसेंबर पासून व्हॉलूम कॅपचा निर्णय लागू करावा अशी मागणी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून करण्यात आली आहे.

    सर्व पैलूंवर व्यापक विचार करण्यासाठी आरबीआयकडून एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत एनपीसीआयच्या अधिकारी, अर्थ मंत्रालय आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. तरी या बैठकी दरम्यान व्हॉल्युम कॅपचा निर्णय पुढे ठकल्यान्याबाबात कुठलाही निर्णय घेण्यात आयला नाही अशी माहिती मिळाली आहे.NPCI ला मुदत वाढवण्यासाठी गुगल पे किंवा फोन पे कडून निवेदने देण्यात आली आहेत आणि त्यांची तपासणी केली जात आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तरी येणाऱअया पुढील काही दिवसात तुमच्या गुगल पे किंवा फोन पे पेमेंटवर मर्यादा लागू होईल ही शक्यता नाकारता येणार नाही.