टू व्हीलरमध्ये आजही स्प्लेंडर बाईकचाच दबदबा, या आहेत टॉप १० बाईक

एकंदर दुचाकी उद्योगाचा विचार करता २०१९ सालात १४ लाख १० हजार ९३९ दुचाकींची विक्री झालीय. तर यावर्षी आतापर्यंत विकल्या गेलेल्या दुचाकींचा आकडा १६ लाखाच्याही वर पोहोचलाय. म्हणजेच आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दुचाकींचा खप १३.४ टक्क्यांनी वाढलाय.

भारतीय बाजारात गेल्या कित्येक वर्षांपासून असलेला दबदबा हिरो मोटोकॉप कंपनीनं आजही कायम ठेवलाय. या वर्षात कंपनीनं ५ लाख ७५ हजार ९५७ दुचाकी विकल्यात. गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या दुचाकींपेक्षा हे प्रमाण १३.८ टक्के अधिक आहे.

एकंदर दुचाकी उद्योगाचा विचार करता २०१९ सालात १४ लाख १० हजार ९३९ दुचाकींची विक्री झालीय. तर यावर्षी आतापर्यंत विकल्या गेलेल्या दुचाकींचा आकडा १६ लाखाच्याही वर पोहोचलाय. म्हणजेच आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दुचाकींचा खप १३.४ टक्क्यांनी वाढलाय.

खपाच्या आधारे टॉप १० दुचाकींमध्ये हिरोची स्प्लेंडर, एचएफ डिलक्स आणि पॅशन यांनी बाजी मारलीय. स्प्लेंडरच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.२५ टक्क्यांनी वाढ झालीय. सुझुकी ऍक्सेस आणि बजाज प्लॅटिना या दोन दुचाकी वगळता टॉप १० मधील सर्व दुचाकींच्या विक्रीत यंदा वाढ नोंदवली गेलीय.

स्प्लेंडरच्या खालोखाल होंडा ऍक्टिव्हा या गाडीचा सर्वाधिक खप नोंदवला गेलाय. गेल्या वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ६.४४ टक्के अधिक ऍक्टिव्हा गाड्या विकल्या गेल्यात. एचएफ डिलक्स या दुचाकीच्या विक्रीतही १२.४६ टक्के वाढ नोंदवली गेलीय.

पल्सर स्पोर्टी बाईकचा खपदेखील दिवसेंदिवस वाढत चाललाय. या बाईकच्या विक्रीत तब्बल ५३.६६ टक्के वाढ नोंदवली गेलीय. सीबी शाईन या बाईकनं टॉप टेनच्या यादीत सहावा नंबर मिळवलाय. त्यापाठोपाठ टीव्हीएस ज्युपीटर, हिरो पॅशन, सुझुकी ऍक्सेस आणि बजाज प्लेटिना या दुचाकींचा समावेश आहे.

विकल्या गेलेल्या टॉप १० बाईक

  • हिरो स्प्लेंडर – २४८३९८
  • होंडा ऍक्टिव्हा – २२५८२२
  • हिरो एचएफ डिलक्स – १७८४२६
  • बजाज पल्सर – १०४९०४
  • होंडा सीबी शाईन – ९४४१३
  • टीव्हीएस एक्सेल – ७०७५०
  • टीव्हीएस ज्युपीटर – ६२६२६
  • हिरो पॅशन – ५३७६८
  • सुझुकी ऍक्सेस – ४५५८२
  • बजाज प्लेटिना – ४१५७२