LPG Price : अर्थसंकल्पादिवशीच सर्वसामान्यांना महागाईचा जोर का झटका धीरे से ; LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी ‘वाढ’

अर्थसंकल्पाआधीच इंडियन ऑइलने कमर्शिअल एलपीजी सिलिंडर च्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. १९ किलोग्राम कमर्शिअल एलपीजी सिलिंडरची किंमत १९० रूपयांनी वाढवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज तीसरा अर्थसंकल्प सादर केला. भारताच्या इतिहासात प्रथमच हा अर्थसंकल्प पेपरलेस सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशीच महागाईचा जोर का झटका धीरे से दिला आहे.

अर्थसंकल्पाआधीच इंडियन ऑइलने कमर्शिअल एलपीजी सिलिंडर च्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. १९ किलोग्राम कमर्शिअल एलपीजी सिलिंडरची किंमत १९० रूपयांनी वाढवण्यात आली आहे. दिलासादयक म्हणजे यावेळी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.