आजच्या अर्थसंकल्पामुळे कोणाच्या पगारात झालीये घसघशीत वाढ, आता मिळणार आहे ‘इतकं’ मानधन; वाचा

महाराष्ट्र राज्याचा २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra State Budget 2023-24) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षणसेवकांसह, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस, कोतवाल यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे ती पुढीलप्रमाणे :

  • शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
  • माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
  • उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

आशास्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

  • आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
  • गट प्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
  • अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
  • मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
  • अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये

12,793 कोतवालांचे मानधन सरसगट 15 हजार रुपये