‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’तर्फे ‘कॅटपल्ट’ या स्टार्ट-अप्ससाठीच्या खास प्लॅटफॉर्मची दुसरी आवृत्ती जाहीर

स्टार्ट-अप्ससाठी (Start-Ups) असलेल्या या विशेष प्लॅटफॉर्मवर येत्या दि. 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या अर्जांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर या काळात होईल आणि प्रीमियर डे दि. 30 एप्रिल 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

  • ‘कॅटपल्ट 2.0’साठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2021पर्यंत

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या ‘थर्ड-पार्टी लॉजिस्टिक’ (थ्रीपीएल) सोल्यूशन पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स लि.’ (Mahindra Logistics Ltd.) तर्फे (एमएलएल) ‘कॅटपल्ट’ (Catapult) ची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

स्टार्ट-अप्ससाठी (Start-Ups) असलेल्या या विशेष प्लॅटफॉर्मवर येत्या दि. 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या अर्जांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर या काळात होईल आणि प्रीमियर डे दि. 30 एप्रिल 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

‘कॅटपल्ट’च्या या दुसऱ्या आवृत्तीमध्ये लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी, तसेच मोबिलिटी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या सोल्यूशन्सवर भर देण्यात येणार आहे. यामध्ये विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल), ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), रोबोटिक्स व ऑटोमेशन, व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) व ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर), ड्रोन्स, बिग डेटा व ॲनालिटिक्स, लो कॉस्ट हार्डवेअर / कनेक्टिव्हिटी/ जीपीएस-आधारित सोल्यूशन्स आणि ई-मोबिलिटी सोल्युशन्स यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

‘महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रामप्रवीण स्वामिनाथन म्हणाले, “वाणिज्य क्षेत्र गतिमान करणे आणि समुदायांना प्रगतीसाठी सक्षम करणे हा आमचा एमएलएलमध्ये उद्देश असतो. हे साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा पाया आहे आणि आम्ही त्याचा उपयोग वर्षानुवर्षे केलेला आहे. कॅटपल्ट हा एक अनोखा प्लॅटफॉर्म आम्ही सादर करीत आहोत. हा प्लॅटफॉर्म लॉजिस्टिक्स क्षेत्रातील स्टार्ट-अप समुदायाला उभे राहण्यास सहाय्य करतो, त्यांना सक्रीय करतो, गती देतो आणि सक्षम करतो. भारतीय पुरवठा साखळी व मोबिलिटी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणे आणि भारतीय स्टार्ट-अप परिसंस्थेसह भविष्यासाठी सुसज्ज, तंत्रज्ञान-सक्षम सोल्यूशन्स तयार करणे हे ‘कॅटपल्ट’चे उद्दिष्ट आहे”.

‘कॅटपल्ट’च्या पहिल्या आवृत्तीला पुरवठा-साखळी व मोबिलिटी परिसंस्थेमधील 300हून अधिक स्टार्टअप्सकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. काटेकोर मूल्यमापनाच्या प्रक्रियेनंतर त्यात 16 स्टार्ट-अप निवडले गेले. या निवडलेल्या गटातील कंपन्यांनी काही वास्तविक स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये सहभागी होत, मार्केट-रेडी सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी महिंद्रा कंपन्यांना 3 महिन्यांच्या कालावधीसाठी सहकार्य केले.

अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी कृपया www.mahindralogistics.com/catapult या वेबसाईटला भेट द्या.