डिझाईनर वेअर उपयुक्त बनवत आहे: ॲमेझॉन फॅशनवर रिव्हर सेशन 2 ची सुरूवात

ग्राहक अत्याधुनिक ट्रेंड्स आणि पारंपारिक यांचे सुंदर मिश्रण असलेले आकर्षक कपडे खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करतील. सुंदर आणि आकर्षक साडी आणि अप्रतिम बंदगळा पासून पारंपारिक (इथनिक) जॅकेट, पुरूषांसाठी ट्रेंडी शर्ट्स आणि कुर्ता यांपर्यंत रिव्हर सेशन 2 कलेक्शनचा प्रत्येक दिवसाच्या लूक सोबतच प्रत्येक डिझाईनरच्या कलेक्शन मधील उत्तमतेसह प्रासंगिक घालता येणाऱ्या निवडी तयार करण्यावर भर आहे.

    मुंबई : DBS लाईफस्टाईल LLP च्या सहकार्याने ॲमेझॉन फॅशनने आज भारतामध्ये रिव्हरसेशन 2 च्या सुरूवातीची घोषणा केली. रिव्हरच्या यशस्वी सुरूवातीनंतर, मागच्या वर्षी रिव्हर सेशन 2 मध्ये सुनीत वर्मा, जेजे वालाया आणि नम्रता जोशीपुरा यांसारख्या प्रसिद्ध डिझाईनरच्या भागीदारीत परवडणारा मल्टी-डिझाईनर ब्रॅण्ड तयार करण्यात आला होता ज्यामध्ये त्यांच्या स्वतंत्र सौंदर्य आणि शैलींचे स्वरूप लक्षात येते. रिव्हर सेशन 2 ग्राहकांना केवळ ॲमेझॉन फॅशनवर त्यांच्या आवडत्या डिझाईनर लेबलची पुन्हा कल्पना करण्याची संधी देईल.

    काळजीपूर्वक तयार केलेल्या या निवडी पुरूष आणि महिला दोघांसाठीही आहेत, ज्यामध्ये ग्राहक अत्याधुनिक ट्रेंड्स आणि पारंपारिक यांचे सुंदर मिश्रण असलेले आकर्षक कपडे खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करतील. सुंदर आणि आकर्षक साडी आणि अप्रतिम बंदगळा पासून पारंपारिक (इथनिक) जॅकेट, पुरूषांसाठी ट्रेंडी शर्ट्स आणि कुर्ता यांपर्यंत रिव्हर सेशन 2 कलेक्शनचा प्रत्येक दिवसाच्या लूक सोबतच प्रत्येक डिझाईनरच्या कलेक्शन मधील उत्तमतेसह प्रासंगिक घालता येणाऱ्या निवडी तयार करण्यावर भर आहे.

    ॲमेझॉन फॅशन इंडियाचे संचालक आणि प्रमुख सौरभ श्रीवास्तव म्हणाले, “रिव्हर सेशन 1 भारतभरातील खरेदीदाराकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा साक्षीदार आहे, ज्यामध्ये सर्व डिझाईनर कलेक्शन साठी मेट्रो आणि मध्यम व लघू शहरे अशा सगळीकडूनच मागणी वाढली आहे. ॲमेझॉन फॅशनवर रिव्हर सेशन 2 च्या सुरूवातीसह, आम्ही भारतभरातील ग्राहक परवडणाऱ्या डिझाईनर वियरचा लाभ घेऊ शकतील याची खात्री करण्यासाठी विक्रेता DBS लाईफस्टाईल सह जवळून काम करत आहोत. रिव्हर सेशन 2 च्या माध्यमातून, वैविध्यपूर्ण ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आणि डिझाईनरच्या क्रिएटीव दृष्टीपर्यंत त्यांना पोहोचण्यास मदत करण्याचा आमचा उद्देश्य आहे.”

    ते पुढे म्हणाले, “हा सेशन सुनीत वर्मा, जेजे वालाया आणि आशिष सोनी यांच्या कलेक्शन व्यतिरीक्त नम्रता जोशीपुरा यांसारख्या महिला-केंद्रित कलेक्शनसह नवीन डिझाईनर सुविधांमधून नवीन संधी शोधतो. नवीन सेशन सध्याच्या मार्केट ट्रेंडच्या अनुषंगाने आहे ज्यात पुरूष आणि महिला दोन्हींसाठी विवाह कलेक्शन आणि पार्टी वियर यांवर अधिक भर दिल्या जातो. पुढील सेशन मध्ये नवीन डिझाईनरला समोर आणणे आणि आकर्षक ऑफर्स देणे यांसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू. RIVER ने डिझायनर्ससाठी निवडी आणि आवाका या दोन्ही माध्यमातून नवीन मार्ग उघडले आहेत आणि देशातील सर्व स्तरांमधील संभाषणांचा एक भाग बनला आहे.”

    रिव्हर सेशन 2 मध्ये पुरूष आणि महिला दोन्हींसाठी कॅज्युअल, बेसिक आणि ट्रेंडी शर्ट्स, क्लासिक ट्राऊजर, जॅकेट आणि साडीसाठी बंदगळा, ड्रेसेस, जंपसुट्स, ब्लाऊज, स्कार्फ आणि कोऑर्डिनेट्स यांच्या 180 स्टाईल्स आहेत.

    विवाह आणि समारंभ यांसारख्या प्रसंगी सुनीत वर्मा यांच्याकडे डिझाईन केलेल्या काही सुंदर साड्या आहेत. शिफॉन जॉर्जेट आणि लेसमधील फुलांच्या साड्यांची निवड ही एक उत्कृष्ट श्रेणी आणते. निवडीमध्ये जेजे वालाया यांच्याकडून पुरूषांसाठी शर्ट आणि बंदगळा तसेच महिलांसाठी काही सुंदर ड्रेसचे सादरीकरण केलेले आहे. आशिष सोनी यांच्या कलेक्शनचे शर्ट्स आणि कुर्ता यांसह मेन्सवियर मध्ये आकर्षक डिझाईन हे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडून काही सुंदर डेनिम ब्लेझर्स आणि बंदगळा आणि शर्ट्स आणि आरामदायी ट्राऊजर मध्ये फार सुंदर प्रिंट सुद्धा मिळाल्या आहेत. नम्रता जोशीपुरा यांच्या कलेक्शन मधील आऊटफिट प्रत्येक महिलेला दिवस आणि सायंकाळी घालण्यासाठी उत्तम उपाय देतो आणि वूमन्सवियर मध्ये नवीन श्रेणी देतो.
    या सुरूवातीमध्ये मध्यम व लघू शहरांमधील ग्राहकांच्या अनन्य आणि प्रादेशिक गरजा सामावून घेतल्या आहेत, ज्यामुळे ॲमेझॉनच्या फुलफिल नेटवर्क मधून 100% सेवायोग्य पिन कोड्स मधील ग्राहकांना डिझाईनर वियरचा लाभ मिळणार आहे.

    रिव्हर स्टोअर डिझाईनर विभागातील विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी आकर्षक आणि उत्तम खरेदीचा अनुभव देणाऱ्या प्रेमाने तयार करण्यात आले आहे, ज्यांमधील सर्व ग्राहक आता ऑर्डर करण्याआधी माहितीपूर्ण खरेदी निर्णय घेऊ शकतील. स्टोअर साईज, उत्पादनाचा तपशील आणि वॉश आणि केयर सूचना सोबतच स्टायलिंग टिप्स आणि उत्पादनाचे विस्तृत फोटो यांची विस्तृत माहिती देतो ज्यामुळे ग्राहकांना काळजीपूर्वक आणि सोयीस्करपणे निवड करण्यास मदत होतील.

    वैशिष्ट्ये

    • ॲमेझॉन फॅशनने DBS लाईफस्टाईल LLP च्या सहकार्याने सुनीत वर्मा, जेजे वालाया, आशिष सोनी आणि नम्रता जोशीपुरा यांसारख्या भारतातील प्रसिद्ध डिझाईनरच्या भागीदारीत तयार झालेल्या परवडणाऱ्या, मल्टी-डिझाईनर ब्रॅण्ड चा दुसरा सेशन असलेल्या रिव्हर सेशन 2 ची केली सुरूवात
    • दररोज आणि कार्यप्रसंगी घालता येणाऱ्या कपड्यांचे प्रकार सादर करण्यासाठी रिव्हर च्या सेशन 2 मध्ये सुनीत वर्मा, जेजे वालाया, आशिष सोनी आणि नम्रता जोशीपुरा हे एकत्र आले आहेत
    • ग्राहक केवळ ॲमेझॉन फॅशनवरच त्यांच्या आवडत्या डिझाईनर कडून मर्यादित स्वरूपात स्टाईलची खरेदी करू शकतात