आधीच पेट्रोल डिझेलचा झालाय भडका आणि महागाईच्या आगीत काडीलाही पोहोचणार झळ

पाच प्रमुख माचिस उद्योगांच्या प्रतिनिधींच्या सर्व सहमतीने डिसेंबरपासून माचिसची (MatchBox) जास्तीत जास्त किरकोळ विक्री किंमत १ रुपयाने वाढवून २ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. माचिसच्या किंमतीत (MatchBox Price) अखेरचं संशोधन २००७ साली झालं होतं.

  मदुराई : १४ वर्षात फक्त एकच गोष्ट अशी होती की, जिने तुमच्या खिशाला छळ बसली नाही. महागाईचा वाढता बोजा पाहता ‘ती’ थोडीशी हलकी नक्कीच झाली. पण आता १४ वर्षांच्या दीर्घ मुदतीनंतर माचिसचे (MatchBox) दर येत्या काही दिवसात वाढणार आहेत. ते आता १ रुपयाने आणखी वाढणार (Costlier) आहेत. डिसेंबरपासून माचिस (MatchBox) दोन रुपयांना मिळणार आहे.

  पाच प्रमुख माचिस उद्योगांच्या प्रतिनिधींच्या सर्व सहमतीने डिसेंबरपासून माचिसची (MatchBox) जास्तीत जास्त किरकोळ विक्री किंमत १ रुपयाने वाढवून २ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. माचिसच्या किंमतीत (MatchBox Price) अखेरचं संशोधन २००७ साली झालं होतं. त्यावेळी याची किंमत ५० पैशांनी (50 Paise) वाढवून १ रुपया करण्यात आली होती. माचिसच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी शिवकाशीमध्ये (Shivkashi) ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या (All India Chember Of Matches) बैठकीत घेण्यात आला.

  उद्योग प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या किंमतीत (raw material price) अलीकडेच झालेल्या दरवाढीचे कारण असल्याचे म्हटले आहे. उत्पादकांनी म्हटले आहे की, माचिस तयार करण्यासाठी १४ कच्च्या मालाची आवश्यकता असते. एक किलोग्राम लाल फॉस्फरस ४२५ रुपयांनी वाढून (Costlier) ८१० रुपये झाला आहे. अशाप्रकारे मेण ५० रुपयांऐवजी ८० रुपये, बाहेरील बॉक्सबोर्ड ३६ रुपयांऐवजी ५५ रुपये आणि आतील बॉक्सबोर्ड ३२ रुपयांवरून ५८ रुपयांवर गेला आहे. कागद, स्प्लिंट्स, पोटॅशिअम क्लोराईड आणि सल्फरच्या किंमतीतही १० ऑक्टोबरपासून वाढ झाली आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीनेही हा बोजा अधिक वाढला आहे.

  आता २७०-३०० रुपयांना विकला जातोय ६०० माचिसचा बंडल

  नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे सचिव व्हीएस सेथुरथिनमने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, उत्पादक ६०० माचिस (प्रत्येक बॉक्स मध्ये माचिसच्या ५० काड्या)चा एक बंडल २७० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत विक्री करत आहेत. आम्ही आमच्या युनिट्सची विक्री किंमत ६०% ने वाढवून ४३०-४८० रुपये प्रति बंडल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये १२% जीएसटी आणि वाहतुकीचा खर्च समाविष्ट नाही.

  तामिळनाडूमध्ये ४ लाख लोक या उद्योगाशी संबंधित आहेत

  तमिळनाडूमध्ये या उद्योगात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुमारे चार लाख लोक कार्यरत आहेत आणि प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांमध्ये ९० % पेक्षा जास्त महिला आहेत. कर्मचार्‍यांना चांगले पगार देऊन अधिक स्थिर कर्मचारी आकर्षित करण्याची उद्योगाची अपेक्षा आहे. याचे कारण असे आहे की, बरेच लोक मनरेगा अंतर्गत काम करण्यास स्वारस्य दाखवत आहेत कारण तेथे वेतन चांगले आहे.