९ राज्यातील १५ शहर गॅस वितरण प्रकल्प मिळवण्यात MEIL ने मारली बाजी

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) भारतातील 65 भौगोलिक क्षेत्रांसाठी (GA) सिटी गॅस वितरण (CGD) प्रकल्पासाठी टेंडर मागवले होते. या अंतर्गत टेंडर मधील अटीनुसार यशस्वी बोलीदारांना सिटी गेट स्टेशन किंवा मदर स्टेशन बांधावे लागतील, मुख्य पाइपलाइन आणि वितरण पाइपलाइन आणि CNG स्टेशन्स उभारावी लागतील.

    हैदराबाद : हैदराबादची मातब्बर कंपनी मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) सिटी गॅस वितरणात भारतातील सर्वाधिक जास्त भौगोलिक क्षेत्रांसाठी (GA) यशस्वी बोलीदार ठरली आहे. 15 भौगोलिक क्षेत्रांसाठी बोली जिंकून सिटी गॅस वितरणात MEIL ने बाजी मारली आहे.

    पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) भारतातील 65 भौगोलिक क्षेत्रांसाठी (GA) सिटी गॅस वितरण (CGD) प्रकल्पासाठी टेंडर मागवले होते. या अंतर्गत टेंडर मधील अटीनुसार यशस्वी बोलीदारांना सिटी गेट स्टेशन किंवा मदर स्टेशन बांधावे लागतील, मुख्य पाइपलाइन आणि वितरण पाइपलाइन आणि CNG स्टेशन्स उभारावी लागतील.
    CGD चे उद्दिष्ट घरगुती आणि उद्योगांसाठी (घरगुती किंवा औद्योगिक वापरासाठी) पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) (नैसर्गिक वायू) आणि वाहने आणि ऑटोमोबाईल उद्योगासाठी इंधन म्हणून वापरल्या जाणार्‍या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ला प्रोत्साहन देणे हे आहे.

    MEIL ला यापूर्वी CGD च्या 10 व्या बोली अंतर्गत 3 GA प्रदान करण्यात आले होते.तुमकूर आणि बेळगाव (कर्नाटक), कृष्णा (आंध्र प्रदेश) आणि नलगोंडा, वारंगल, रंगा रेड्डी आणि खम्मम (तेलंगणा) या भागांचा यात समावेश होतो. मेघा गॅस या ब्रँड अंतर्गत 3 राज्यांमध्ये 32 सीएनजी स्टेशन कार्यान्वित झाले आहेत.