मायक्रोसॉफ्ट आणि टेक डेटा या टीडी सिनेक्स कंपनीतर्फे २३ नोव्हेंबरला पुण्यात टेक मार्टचे आयोजन

यातील २७ टक्के कंपन्या पूर्णपणे किंवा बहुतांश क्लाऊड आधारित आहेत आणि ही टक्केवारी येत्या दोन ते तीन वर्षांत जागतिक सरासरीइतकी होण्याचा अंदाज आहे.

  • भविष्यातील क्लाऊड अवलंबाबद्दल प्रचंड आशावादी भारतीय (एसएमबीज) छोटे व मध्यम उद्योगांच्या डिजिटल बदलांना मायक्रोसॉफ्टचे सातत्यपूर्ण साह्य, व्यवसायांना करणार सक्षम
  • पुण्यात टेक मार्टचे दुसरे पर्व
  • डिजिटल अर्थव्यवस्थेत व्यवसायांना पाठबळ

पुणे : महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (Micro, Small and Medium Enterprises in Maharashtra) म्हणजेच एमएसएमईजची परिसंस्था प्रगतीशील ठरत आहे. या क्षेत्रातील आकडेवारीनुसार, राज्यातील जवळपास ४७.७८ लाख एमएसएमईजचा देशातील एकूण एमएसएमईजमध्ये साधारण ८ टक्के वाटा आहे आणि आर्थिक वर्ष २०-२१ मध्ये या उद्योगांमध्ये ११ लाखांहून अधिक कर्मचारी होते.

मायक्रोसॉफ्ट एसएमबी व्हॉईस ॲण्ड ॲटिट्यू्डस टू टेक्नॉलॉजी (Microsoft SMB Voice and Attitudes Toward Technology) स्टडी २०२२ नुसार, भारतातील लघु आणि मध्यम व्यवसाय (स्मॉल ॲण्ड मिडीअम बिझनेसेस -एसएमबी) भविष्यात क्लाऊड अवलंबाबद्दल सर्वाधिक आशावादी आहेत. यातील २७ टक्के कंपन्या पूर्णपणे किंवा बहुतांश क्लाऊड आधारित आहेत आणि ही टक्केवारी येत्या दोन ते तीन वर्षांत जागतिक सरासरीइतकी होण्याचा अंदाज आहे. याच प्रकारच्या जागतिक कंपन्यांच्या तुलनेत भारतातील एसएमबीज तंत्रज्ञान अवलंबात आघाडीवर आहेत. यातील ३५ टक्के कंपन्या आपला १० टक्क्यांहून अधिक महसूल तंत्रज्ञानासाठी खर्च करतात.

आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी एसएमबीज सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत असताना मायक्रोसॉफ्टही त्यांना सध्याच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यात आणि नाविन्यतेचा मार्ग अवलंबण्यास सक्षम करण्याची आपली बांधिलकी जपत आहे. या बांधिलकीचा भाग म्हणून, मायक्रोसॉफ्ट आणि टेक डेटा या टीडी सिनेक्स कंपनीतर्फे २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात टेक मार्टचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील उद्योगांना तंत्रज्ञानाचे पर्याय, साधने आणि मार्गदर्शन पुरवून साह्य करणे तसेच त्यांच्या आजघडीच्या आणि भविष्यातील अनोख्या गरजा पूर्ण करणे, हा यामागील उद्देश आहे.

या ठिकाणी कंपन्यांना आपल्या व्यवसायातील आव्हानांसंदर्भात प्रत्यक्ष आणि ‘वन-टू-वन’ सल्लामसलत करून आपल्या डिजिटल बदलांच्या प्रवासाला वेग देता येईल. या टेक मार्टमध्ये कोलॅबॅरेशन, सेक्युरिटी, प्रोडक्टिव्हिटी, होस्टिंग सुविधा आणि क्लाऊडवरील ॲप्लिकेशन, फायनान्स ॲण्ड ऑपरेशन्स, एचआर आणि अगदी कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट अशा विविध विषयांवरील पर्याय उपलब्ध असतील.

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे भेट द्या.

एसएमबीजना पाठबळ देण्याच्या कंपनीच्या उपक्रमाविषयी मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या कॉर्पोरेट, मीडिअम ॲण्ड स्मॉल बिझनेस विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (कार्यकारी संचालक) समिक रॉय म्हणाले, “मायक्रोसॉफ्टने देशातील अनेक एसएमबीजना क्लाऊडवर जाण्यात साह्य केले आहे. आमच्या भागीदारांच्या साथीने आम्ही कंपन्यांना डिजिटल बदलांच्या या प्रवासाला वेग देण्यात साह्य केले आहे. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे व्यापक पर्याय देऊ केले आहेत. आम्ही या प्रगतीशील एसएमबी परिसंस्थेचा सखोल अभ्यास करत आहोत, त्यांच्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षा आणि त्यातील आव्हाने समजून घेत आहोत. या व्यवसायांना सुरक्षित, वाजवी दरातील आणि वापरण्यास सोपे तंत्रज्ञान आणि पर्याय देऊ करत त्यांना सक्षम करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सातत्याने गुंतवणूक करत आहे. राष्ट्रावर एसएमबीजचा चांगला परिणाम होऊ शकतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे. या व्यवसायांना उत्पादक बनवण्यात, कुठूनही काम करत अधिक लवचिक, चपळ आणि भविष्यासाठी सज्ज करण्यात साह्य करण्याची आमची बांधिलकी अधिक दृढ करतच टेक मार्टसारखे उपक्रम राबवले जात आहेत.”

एक विश्वासार्ह तंत्रज्ञान नेतृत्व म्हणून मायक्रोसॉफ्टने भारतातील २००,००० हून अधिक एसएमबी ग्राहकांना सेवा पुरवल्या आहेत. देशभरातील १७,००० हून अधिक भागीदारांच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट या एसएमबीजना साह्य करते. त्याचप्रमाणे, त्यांच्या डिजिटल बदलांच्या संपूर्ण प्रवासात त्यांची आयटीमधील वाटचालीसंदर्भातील धोरणे, खरेदी, डिप्लॉयमेंट आणि व्यवस्थापन यात लवचिकता असेल, याची खातरजमा केली जात आहे.