mobiles year end sale on flipkart check top deals on smartphones nrvb
Flipkart सेल : Xiaomi, Realme, Apple, Vivo सारख्या कंपन्यांच्या मोबाइलवर मिळतेय सूट

फ्लिपकार्टने ICICI बँकेसोबत भागीदारीही केली आहे. या अंतर्गत बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 % तात्काळ डिस्काऊंटचा फायदा ग्राहकांना होईल. क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त ग्राहकांना बँक डिस्काऊंटचा फायदा EMI ट्रान्झेक्शन्सवरही मिळणार आहे.

Flipkart पुन्हा एकदा नव्या स्मार्टफोनसेलसह आपल्या दिमतीला हजर झाली आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर मोबाइल्स ईयर एन्ड सेल आयोजित केला आहे. सेलची सुरुवात काल झाली असून तो 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या तीन दिवसांच्या सेलमध्ये ग्राहक सॅमसंग, ॲपल, विवो ओप्पो आणि रियलमा सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवर विविध प्रकारच्या डिल्स आणि डिस्काऊंट्सचा लाभ घेऊ शकतील.

फ्लिपकार्टने ICICI बँकेसोबत भागीदारीही केली आहे. या अंतर्गत बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 % तात्काळ डिस्काऊंटचा फायदा ग्राहकांना होईल. क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त ग्राहकांना बँक डिस्काऊंटचा फायदा EMI ट्रान्झेक्शन्सवरही मिळणार आहे.

सेलमध्ये अलीकडेच लाँच झालेला Vivo V20 Pro वर 2,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काऊंटही उपलब्ध आहे. या फोनच्या फ्रंटला 44MP सेल्फी कॅमेरा आहे. दुसरीकडे Vivo S1 Pro बाबत सांगायचं झालं तर सेलमध्ये हा फोन 15,990 रुपयांना उपलब्ध आहे.

Xiaomi Mi 10T सीरिझचे स्मार्टफोन्स 30,999 रुपयांच्या प्राथमिक किंमतीला उपलब्ध आहे. Mi 10T ची मूळ किंमत 35,999 रुपये आहे. तथापि, ICICI बँक डिस्काऊंटनंतर हा 30,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर, Mi 10T Pro मॉडेल सेलमध्ये बँक डिस्काऊंटनंतर 34,999 रुपयांना उपलब्ध आहे.

जर Apple iPhones वर डिस्काऊंटच्या शोधात असाल तर आपल्याला सांगू इच्छितो की, सेलमध्ये iPhone SE 32,999 रुपयांना मिळत आहे. या फोनवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत 13,200 रुपयां पर्यंतच्या सुटीचाही फायदा घेता येणार आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone XR डिस्काऊंटनंतर 38,999 रुपयांत उपलब्ध होणार आहे. सेलमध्ये ॲपल iPhone 11 Pro 79,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीला उपलब्ध आहे.

ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवर Oppo F17 आणि F17 Pro ची विक्री अनुक्रमे 16,990 रुपये आणि 21,490 रुपयांत होणार आहे. सॅमसंग Galaxy F41 सेलमध्ये डिस्काऊंट असल्याने 15,499 रुपयांना विकत घेता येईल. अशाचप्रकारे फ्लिपकार्टवर Realme 6 ची विक्री 11,999 रुपयांत होणार आहे.