मुकेश अंबानींच्या जिओला जबरदस्त झटका; 1.9 कोटी ग्राहकांनी Jio चे नेटवर्क बंद केले आणि…

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जिओ कंपनीला सप्टेंबर महिन्यात मोठा झटका बसला. सप्टेंबर 2021 महिन्यात 1.9 कोटी ग्राहकांनी रिलायन्स जिओची साथ सोडली( Mukesh Ambani's Geo hit hard; 1.9 crore subscribers shut down Jio's network).

    मुंबई : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जिओ कंपनीला सप्टेंबर महिन्यात मोठा झटका बसला. सप्टेंबर 2021 महिन्यात 1.9 कोटी ग्राहकांनी रिलायन्स जिओची साथ सोडली( Mukesh Ambani’s Geo hit hard; 1.9 crore subscribers shut down Jio’s network).

    दुसरीकडे, जिओची प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलने या दरम्यान 2.74 लाख नवीन मोबाइल ग्राहक जोडले. वोडाफोन आयडियाच्या कनेक्शनमध्येही 10.77 लाखांची घट झाली, अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) आकडेवारीतून समोर आली आहे.

    देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या सप्टेंबर पर्यंत 42.48 कोटी मोबाइल ग्राहक होते. परंतु, सप्टेंबर महिन्यात त्यांनी 1.9 कोटी कनेक्शन गमावले. या दरम्यान, एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 35.44 कोटी झाली. जी ऑगस्ट मध्ये 35.41 कोटी होती. तसेच वोडाफोन आयडिया कनेक्शन मध्ये 10.77 लाख घसरण झाली आहे.

    उल्लेखनीय म्हणजे, रिलायन्स जिओ ने सप्टेंबर मध्ये तिमाहीत परिणामांची घोषणा करताना ग्राहकांच्या संख्येत घसरण होईल, असा अंदाज वर्तवला होता. या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण वायरलेस कनेक्शनची संख्या कमी होवून ती 116.60 कोटी वर पोहोचली आहे. ही आकडेवारी ऑगस्टमध्ये 118.67 कोटीवर होती.