GST on Notice period : नया है यह! विचार करा पक्का : आता नोकरी सोडताना खिसा फाटणारच, नोटिस पीरियडसाठी भरावा लागणार GST

आता हेही सोपं राहिलेलं नाही कारण,प्राप्तिकर विभागाच्या ऑथोरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंगने (Authority for Advance Ruling) नमूद केले आहे की, नोटीस पीरियडमध्ये (Notice period) काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनावर, ग्रुप इन्श्युरन्स पॉलिसीसाठी कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त प्रिमियम घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन बिल (Mobile Phone Bill) भरण्यावर आता कंपनीला जीएसटी (GST) भरावा लागणार आहे.

  GST on Notice period : नवी दिल्ली : आजच्या परिस्थिती कुटुंबाचा चरितार्थ (Family Expences) चांगल्या पद्धतीने चालवायचा असेल तर कर्मचाऱ्यांनाही नोकरी बदलणं गरजेचं (Change The Job For Employees Necessary) झालं आहे. जेणेकरून खर्चाची जुळवाजुळव करताना ओढाताण होऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईशी दोन हात करताना ही अत्यंत गरजेची बाब झालेली आहे.

  आता हेही सोपं राहिलेलं नाही कारण,प्राप्तिकर विभागाच्या ऑथोरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंगने (Authority for Advance Ruling) नमूद केले आहे की, नोटीस पीरियडमध्ये (Notice period) काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनावर, ग्रुप इन्श्युरन्स पॉलिसीसाठी कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त प्रिमियम घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन बिल (Mobile Phone Bill) भरण्यावर आता कंपनीला जीएसटी (GST) भरावा लागणार आहे.

  काय आहे हा आदेश ?

  प्राप्तिकर विभागाच्या आदेशानुसार कर्मचारी नोटिस पीरियड पूर्ण करताना कंपनी प्रत्यक्षात त्या कर्मचाऱ्याला एक सेवा पुरवते आहे आणि त्यामुळेच त्यावर जीएसटी (GST) कर आकारला पाहिजे. जीएसटीच्या नियमानुसार त्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी कर लागतो जिथे ती क्रिया सेवेच्या रुपात सादर केली जाते. एखाद्या कर्मचाऱ्याला तो ज्या कंपनीत काम करतो आहे, ती कंपनी सोडताना काही दिवसांचा नोटिस पीरियड द्यावा लागतो.

  हा कालावधी अशासाठी असतो की जेणेकरून त्या कालावधीत कंपनी दुसऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करू शकेल. सर्वसाधारणपणे नोटिस पीरियड हा ३० दिवसांचा असतो. कंपनी या कालावधीसाठीसुद्धा कर्मचाऱ्याला वेतन देते. मात्र ऑथोरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंगनुसार कर्मचाऱ्याच्या या वेतनावर कंपनीला आता जीएसटी (GST) कर भरावा लागणार आहे.

  पॉलिसी आणि इतर बिलांवरदेखील GST लागणार

  नोटिस पीरियडमधील वेतनाबरोबरच कंपनीने जर एखादी ग्रुप इन्श्युरन्स पॉलिसी कर्मचाऱ्यासाठी घेतली असेल आणि त्याच्या प्रिमियमचा एक हिस्सा कंपनी जर आपल्या कर्मचाऱ्यांकडून घेत असेल तर त्या अतिरिक्त प्रिमियमवरदेखील कंपनीला (GST) कर भरावा लागणार आहे. शिवाय कंपनी जर त्या कर्मचाऱ्याच्या मोबाइल फोनचे बिल भरत असेल तर त्यावरदेखील कंपनीला जीएसटी कर द्यावा लागणार आहे. मोबाइल बिलावर आधीपासूनच जीएसटी कर द्यावा लागतो आहे.

  कर्मचाऱ्यांना बसणार फटका

  ऑथोरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंगच्या आदेशानुसार या सेवांवरील जीएसटी कर हा कंपनीने भरायचा आहे. मात्र ही गोष्टदेखील स्पष्ट आहे की कंपन्या बहुतांशपणे अशा प्रकारच्या सेवा आणि त्यावरील खर्चाचा बोझा कर्मचाऱ्यांवरच टाकतात. त्यामुळे अनेक कंपन्या हा जीएसटी कर आपल्या कर्मचाऱ्यांकडूनच वसूल करण्याची शक्यता आहे.