आरबीआयच्या संचालक मंडळावर महिंद्रा, टीव्हीएसचे मालक

केंद्र सरकारने (Government Of India) आनंद महिंद्रा (Anand Mahindra), पंकज आर पटेल (Amar Patel) आणि वेणू श्रीनिवासन (Venu Shriniwasan) या उद्योगपतींची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या  केंद्रीय बोर्डात म्हणजेच आरबीआयच्या (RBI) संचालक मंडळावर समावेश केला आहे.

    केंद्र सरकारने (Government Of India) आनंद महिंद्रा (Anand Mahindra), पंकज आर पटेल (Amar Patel) आणि वेणू श्रीनिवासन (Venu Shriniwasan) या उद्योगपतींची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या  केंद्रीय बोर्डात म्हणजेच आरबीआयच्या (RBI) संचालक मंडळावर समावेश केला आहे. याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (Indian Institute Of Management) माजी प्राध्यापक रवींद्र एच ढोलकिया यांनाही बोर्डात सामील करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांची नियुक्ती १४ जूनपासून लागू झाली आहे.

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने आनंद महिंद्रा, रवींद्र ढोलकिया, वेणू श्रीनिवासन आणि पंकज पटेल यांचा समावेश केला आहे. चार वर्षांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांची नियुक्ती १४ जून लागू झाली आहे. दरम्यान, वित्तीय आणि बँकिंग क्षेत्राचे नियामक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कामकाज, भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यांतर्गत केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या केंद्रीय संचालक मंडळाद्वारे नियंत्रित केले जाते.

    आनंद महिंद्रा हे जायंट महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आहेत. ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra And Mahindra) ही या समूहाची कंपनी आहे. वेणू श्रीनिवासन हे टीव्हीएस मोटर (TVS Motors) आणि सुंदरम क्लेटनचे (Sundaram-Clayton Limited) अध्यक्ष एमेरिटस आहेत. पंकज पटेल हे झायडस लाईफसायन्सचे (Zydus Lifesciences) अध्यक्ष आहेत. रवींद्र ढोलकिया आयआयएम अहमदाबाद (IIMA) येथे प्राध्यापक आहेत आणि ते निवृत्त झाले आहेत.