Paytm पेमेण्‍ट्स बँक व मनीग्राम सहयोगाने थेट पेटीएम वॉलेटमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय रेमिटन्‍स देणार

या सहयोगासह मनीग्राम (MoneyGram) चे जगभरातील युजर्स आता त्‍यांच्‍या घरांमधून आरामशीरपणे भारतातील केवायसी पेटीएम वॉलेट (Paytm Wallet) युजर्सना सुलभपणे पैसे पाठवू शकतात. पेटीएम पेमेण्‍ट्स बँकचे लाखो वॉलेट ग्राहक आहेत, जे त्‍यांच्‍या सोयीसुविधेसाठी पेटीएम वॉलेटचा वापर करतात.

  • या सहयोगाच्‍या माध्‍यमातून मनीग्रामचे जगभरातील ग्राहक थेट भारतातील पेटीएम वॉलेटमध्‍ये पैसे पाठवू शकतात

मुंबई : भारताची स्‍वदेशी पेटीएम पेमेण्‍ट्स बँक आणि मनीग्राम इं‍टरनॅशनल इन्‍क. (MoneyGram International, Inc.) (नॅसडॅक: एमजीआय) या डिजिटल पी२पी पेमेण्‍ट्सच्‍या क्रांतीमधील जागतिक अग्रणी कंपनीने आज मनीग्रामच्‍या जगभरातील ग्राहकांना भारतातील पेटीएम वॉलेट युजरला रिअल-टाइममध्‍ये पैसे पाठवण्‍याची सुविधा देण्‍यासाठी सहयोगाची घोषणा केली. ग्‍लोबल रिसीव्‍ह नेटवर्कच्‍या डिजिटायझेशनमधील हा मैलाचा दगड आहे.

या सहयोगासह मनीग्राम (MoneyGram) चे जगभरातील युजर्स आता त्‍यांच्‍या घरांमधून आरामशीरपणे भारतातील केवायसी पेटीएम वॉलेट (Paytm Wallet) युजर्सना सुलभपणे पैसे पाठवू शकतात. पेटीएम पेमेण्‍ट्स बँकचे लाखो वॉलेट ग्राहक आहेत, जे त्‍यांच्‍या सोयीसुविधेसाठी पेटीएम वॉलेटचा वापर करतात. तसेच त्‍यांच्‍या खर्चांवर उत्तम नियंत्रण ठेवण्‍यासोबत मोबाइल, ऑनलाइन व इन-स्‍टोअर पेमेण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून सुरक्षितपणे पेमेण्‍ट्स व युटिलिटी बिल पेमेण्‍ट्स करतात.

हा मनीग्रामचा भारतातील पहिला मोबाइल वॉलेट सहयोग आहे आणि देशामध्‍ये डिजिटलप्रती क्रांती झपाट्याने वाढत असताना महत्त्वपूर्ण विकास आहे. भारतामध्‍ये मनीग्रामचे डिजिटल व्‍यवहार सध्‍या देशामध्‍ये होणा-या एकूण व्‍यवहारांपैकी जवळपास ५० टक्‍के आहेत. बँक खात्‍यांमध्‍ये थेट व्‍यवहार करण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये दोन वर्षांपूर्वीच्‍या १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रमाणावरून जवळपास सहा पट वाढ झाली आहे. यासह मनीग्रामला उच्‍च विकास दराची अपेक्षा आहे, जेथे भारतातील ग्राहक डिजिटल सोयीसुविधांना अधिक प्राधान्‍य देत आहेत.

”आम्‍हाला जगातील सर्वात मोठ्या प्राप्‍तकर्ता बाजारपेठांमध्‍ये आमच्‍या मोबाइल वॉलेट क्षमता विस्‍तारित करण्‍यासाठी पेटीएम पेमेण्‍ट्स बँकेसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे,” असे मनीग्रामचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अॅलेक्‍स होल्म्स म्‍हणाले. ”आमच्‍या रिसीव्‍ह नेटवर्कचे डिजिटायझेशन आमच्‍या विकास धोरणाचा मुलभूत घटक आहे. ज्‍यामधून अपवादात्‍मक निष्‍पत्ती प्राप्‍त झाल्‍या आहेत- जसे या वर्षातील तिस-या तिमाहीमध्‍ये आमच्‍या एकूण डिजिटल व्‍यवहारांमध्‍ये सर्वाधिक वाढीची नोंद झाली. भारतातील, तसेच भारताबाहेरील ग्राहक डिजिटल व्‍यवहारांना अधिक प्राधान्‍य देत असल्‍यामुळे मनीग्राम मागणीची पूर्तता करण्‍यासाठी उत्तमरित्‍या स्थित आहे.”

पेटीएम पेमेण्‍ट्स बँक लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सतिश कुमार गुप्‍ता म्‍हणाले, ”आम्‍ही नेहमीच भारतीयांना एकसंधी, डिजिटल बँकिंग सेवांसह सक्षम करण्‍याचा प्रयत्‍न करतो. पेटीएम वॉलेटमध्‍ये थेट आंतरराष्‍ट्रीय रेमिटन्‍स ट्रान्‍सफर करण्‍याची सुविधा याच दिशेने आणखी एक पाऊल आहे. लाखो भारतीय पेटीएम वॉलेटचा वापर करतात आणि आम्‍ही आशा करतो की, हा सहयोग जगभरातील भारतीय लोकांना रिअल-टाइममध्‍ये घरी पैसे पाठवण्‍यासाठी अद्वितीय सोयीसुविधा व स्थिरता देईल.”

वर्ल्‍ड बँक २०२० च्‍या अंदाजानुसार भारत वर्षासाठी ८३ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्‍या अंदाजित रेमिटन्‍ससह जगातील सर्वात मोठी इनबाऊंड बाजारपेठ आहे.