ॲग्री इन्फ्रा फंड मोहिमेअंतर्गत पीएनबीने जिंकले प्रथम पारितोषिक

ॲग्री इन्फ्रा फंड ही आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत समर्पित योजना आहे. ही पीक कापणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेत मालमत्तेच्या निर्मितीसाठी मध्यम-मुदतीच्या कर्ज सुविधा प्रदान करते. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३,७०० प्रकल्पांना १०,१३१ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

  • कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केली आहे ॲग्री इन्फ्रा फंड मोहीम
  • पीएनबी ने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांच्या श्रेणी अंतर्गत एकूण कामगिरीसाठी जिंकले दुसरे पारितोषिक

मुंबई : देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने (Ministry of Agriculture and Farmers Welfare) सुरू केलेल्या ॲग्री इन्फ्रा फंड मोहिमेअंतर्गत (Agri Infra Fund Campaign) आयोजित “ॲग्री इन्फ्रा फंड पुरस्कार सोहळा २०२२” मध्ये टार्गेट अचिव्हर्स श्रेणीसाठी (Target Achievers Category) पहिले पारितोषिक जिंकले आहे. पीएनबी (PNB) ने कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत एकूण कामगिरीसाठी दुसरे पारितोषिक देखील जिंकले.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी, कैलाश चौधरी, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार, अरुण शर्मा, महाव्यवस्थापक, पीएनबी आणि कुलदीप सिंह राणा, उपमहाव्यवस्थापक, पीएनबी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ॲग्री इन्फ्रा फंड ही आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत समर्पित योजना आहे. ही पीक कापणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेत मालमत्तेच्या निर्मितीसाठी मध्यम-मुदतीच्या कर्ज सुविधा प्रदान करते. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३,७०० प्रकल्पांना १०,१३१ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या प्रसंगी, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मान्यवरांनी आणि अधिकार्‍यांनी बँकेच्या या कामगिरीबद्दल बँकेचे स्वागत केले आणि सशक्त देशाच्या निर्मितीसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रेरित केले.