सणासुदीआधीच महागाईचा भडका : १ हजारी मनसबदार होऊ शकतो Gas Cylinder ; यावर मिळणारी Subsidy पूर्णपणे बंद करणार केंद्र सरकार

सरकार एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीबाबत (Government LPG cylinder subsidy) दुटप्पी भूमिका घेऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे सरकारने आता जसं सुरू आहे ते तसंच सुरू ठेवावं. दुसरे म्हणजे, उज्ज्वला योजने (Ujjwala Yojana) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्राहकांनाच अनुदान दिले पाहिजे.

  नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे (Rising inflation) आधीच सामान्य माणसाचे (Common Peoples) पेकाट मोडलेले असताना केंद्र सरकार (Central Government) आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या काळात ग्राहकांना प्रति LPG सिलिंडरसाठी १००० रुपये मोजावे लागू शकतात. एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी सरकार बंद करू शकते. तथापि, एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवण्याबाबत सरकारचा काय विचार आहे अशी कोणतीही बातमी आलेली नाही. परंतु सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनात असे दिसून आले आहे की, ग्राहक सिलिंडरसाठी एक हजार रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत.

  एलपीजी सिलिंडरबाबत सरकारची दुटप्पी भूमिका

  मीडिया रिपोर्टनुसार, सरकार एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीबाबत (Government LPG cylinder subsidy) दुटप्पी भूमिका घेऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे सरकारने आता जसं सुरू आहे ते तसंच सुरू ठेवावं. दुसरे म्हणजे, उज्ज्वला योजने (Ujjwala Yojana) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्राहकांनाच अनुदान दिले पाहिजे. मात्र, सबसिडी देण्याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितले गेले नाही.

  १ वर्षात सरकारवरील अनुदानाचा भार ६ पटीने कमी झाला

  २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात सरकारने ३,५५९ कोटी रुपये ग्राहकांना सबसिडी म्हणून दिले. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात हा खर्च २४,४६८ कोटी रुपये होता. म्हणजेच एका वर्षातच सरकारने सबसिडीमध्ये सुमारे६ पट कपात केली आहे.

  आता अनुदानासंदर्भात नियम काय आहेत?

  सध्याच्या नियमांनुसार, जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ मिळणार नाही. या व्यतिरिक्त, मे २०२० मध्ये काही ठिकाणी एलपीजीवरील सबसिडी बंद करण्यात आली.

  यावर्षी आतापर्यंत गॅस सिलिंडर १९०.५० रुपयांनी महाग झाला आहे

  या वर्षी १ जानेवारीला दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती. आता सिलेंडरची किंमत ८८४.५० रुपये आहे. म्हणजेच जानेवारीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत १९०.५० रुपयांची वाढ झाली आहे.

  साडे ७ वर्षांत गॅस सिलिंडरची किंमत दुप्पट झाली

  घरगुती गॅस सिलिंडरची किंमत (१४.२ किलो) गेल्या साडे सात वर्षांत दुप्पट झाली आहे. १ मार्च २०१४ रोजी १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ४१०.५ रुपये होती, जी आता ८८४.५० रुपये आहे.

  देशातील २९ कोटी लोकांकडे LPG कनेक्शन आहे

  भारतातील सुमारे २९ कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. यामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे ८ कोटी एलपीजी कनेक्शनचा समावेश आहे.