shaktikant das

आरबीआयकडून (RBI)आपल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या (Monetary Policy Meeting) बैठकीत रेपो दरात २५ ते ३५ टक्क्यांची वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. जूनमध्ये आरबीआयकडून व्याजदरात (Interest Rate) वाढ झाल्यास सर्वसामान्यांसाठी कर्ज घेणं महागणार आहे.

    मुंबई: जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा व्याजदरात वाढ होऊ शकते, असं वक्तव्य रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांनी केलं आहे. जूनमध्ये रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank Of India)  मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (Monetary Policy Meeting) बैठक आहे.(RBI Repo Rate) महागाईवरच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं  शक्तीकांत दास यांनी सांगितलं आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण थांबवण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले.

    आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक ६ ते ८ जून दरम्यान होणार आहे.त्यानंतर आरबीआयच्या धोरणाची घोषणा होईल.

    जूनमध्ये आरबीआयकडून व्याजदरात वाढ झाल्यास सर्वसामान्यांसाठी कर्ज घेणं महागणार आहे. ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. आरबीआयकडून आपल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो दरात २५ ते ३५ टक्क्यांची वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सध्याचा रेपो दर हा ४.४० इतका असून तो ४.७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार आरबीआयकडून केला जाऊ शकतो.

    आरबीआयने नुकतंच रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ केली आहे तर कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये ( Cash Reserve Ratio) ०.५० टक्क्यांची वाढ केली आहे. रेपो दर वाढवल्याने कर्ज महागली आहेत. कर्जावरील व्याज दर वाढल्याने ईएमआयमध्येदेखील वाढ झाली आहे. सध्या रेपो दर हा ४.४० टक्के इतका आहे तर कॅश रिझर्व्ह रेशो हा ४.५० टक्के इतका आहे