RBI Governor Shaktikanta Das

रिझर्व्ह बँकेच्या(Reserve Bank Meeting) आज झालेल्या बैठकीत ईएमआय जैसेथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच व्याज दरातही कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास(Shaktikant Das) यांनी ही घोषणा केली.

  मुंबई : बँक ग्राहकांसाठी (Bank Customer)दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या(Reserve Bank Meeting) आज झालेल्या बैठकीत ईएमआय जैसेथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच व्याज दरातही कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास(Shaktikant Das) यांनी ही घोषणा केली. तसेच कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचंही शक्तिकांत दास यांनी आज स्पष्ट केलं.

  मुद्रा धोरणाची समीक्षा करणारी रिझर्व्ह बँकेची बैठक प्रत्येक दोन महिन्याला होत असते. आज ही बैठक पार पडली. त्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. रेपो रेट ४ टक्क्यावर, रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. एमपीसीने आपला अकोमोडिटिव्ह कायम ठेवला आहे. गेल्या वर्षी (२०२०मध्ये), मार्चमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये ०.७५टक्के आणि मेमध्ये ०.४० टक्के कपात केली होती. या कपातीनंतर रेपो रेट ४ टक्क्याने खाली गेला होता.
  रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२साठी जीडीपीचा अंदाजित दर ९.५ टक्के कायम ठेवला आहे. अर्थव्यवस्था आणि रिकव्हरीला मजबूत ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक दरात वाढ किंवा कपात करण्याचा निर्णय घेईल, असं अनेक जाणकारांचं मत होतं. मात्र, तसं झालं नाही.

  अर्थतज्ज्ञ आणि मार्केटच्या तज्ज्ञांच्या मते आरबीआय पुढच्या बैठकीपर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू शकते. नाइट फ्रँक इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांनी या बैठकीत रिझर्व्ह बँक दर स्थिर ठेवेल असा अंदाज वर्तवला होता.

  शक्तिकांत दास यांच्या मते कृषी सेक्टरच्या मदतीमुळे ग्रामीण भागातील मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृषी सेक्टरलाही मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

  आरबीआयकडून बँकांना कर्ज दिलं जातं. त्याला रेपो रेट म्हटलं जातं. बँक या कर्जातून ग्राहकांना लोन देते. रेपो रेट कमी झाल्यावर बँकेतून मिळणारे अनेक प्रकारचे कर्जही स्वस्त होतात. उदा. होम लोन, कार आणि गोल्ड लोन.

  रिव्हर्स रेपो रेट आहे रेपो रेटच्या उलट असतो. बँकेने आरबीआयमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हटलं जातं.