विक्रमी उसळी! शेअर बाजारात सेन्सेक्स ६०,००० वर

यापूर्वी सेन्सेक्स ५९,५८ वर उघडला, निफ्टी १७,५७० वर उघडला होता. रिअल्टी, मेटल आणि बँकिंग शेअर्सनी बाजारात तेजी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजारावरील रिअल्टी इंडेक्स ८.६६ टक्के च्या वाढीसह बंद झाला.

    आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराने मोठी उसळी घेतलेली पाहायला मिळाली. ट्रेडिंगदरम्यान प्रथमच सेन्सेक्सने ६० हजार पार आणि निफ्टीने १७,८४३ ची उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्स ९५८ अंकांनी वाढून ५९,८८५ आणि निफ्टी २७६ अंकांनी चढून १७,८२३ वर बंद झाला. यापूर्वी सेन्सेक्स ५९,५८ वर उघडला, निफ्टी १७,५७० वर उघडला होता. रिअल्टी, मेटल आणि बँकिंग शेअर्सनी बाजारात तेजी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजारावरील रिअल्टी इंडेक्स ८.६६ टक्के च्या वाढीसह बंद झाला. निफ्टी बँक २.२४ टक्के आणि मेटल इंडेक्स १.६५ टक्क्यांवर बंद झाला. दुसरीकडे बजाज फिनसर्व ४.६३ टक्क्यांच्या वाढीसह निफ्टीचा टॉप गेनर बनला.