भारत 2027 पर्यंत 40 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनू शकतो; मुकेश अंबानींना विश्वास, रिलायन्स फॅमिली डे

आरआयएल कंपनी वटवृक्षाप्रमाणे वाढत राहील. त्याच्या फांद्या रुंद होतील आणि मुळे खोलवर होतील, असे मुकेश अंबानी म्हणाले. तसेच, या झाडाचे बीज पेरणारे आमचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे आम्ही कायम कृतज्ञतेने स्मरण करू. अंबानी यांनी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे प्रमुख असलेले त्यांचा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

    मुंबई : जग २१ व्या शतकाकडे ‘भारताचे शतक’ (Indias Century) म्हणून पाहत आहे आणि २०४७ पर्यंत देश ४० ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनू शकेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कंपनीचे संस्थापक तथा त्यांचे वडील धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त माहिती दिली. भारताच्या इतिहासातील पुढील २५ वर्षे सर्वात परिवर्तनाची असतील, असेही भाकित त्यांनी केले.

    आरआयएल (RIL) कंपनी वटवृक्षाप्रमाणे वाढत राहील. त्याच्या फांद्या रुंद होतील आणि मुळे खोलवर होतील, असे मुकेश अंबानी म्हणाले. तसेच, या झाडाचे बीज पेरणारे आमचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे आम्ही कायम कृतज्ञतेने स्मरण करू. अंबानी यांनी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे प्रमुख असलेले त्यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

    आकाश अंबानीच्या नेतृत्वाखाली २०२३ पर्यंत देशभरात जीओ ५जी (Jio 5G) असेल. जिओ प्लॅटफॉर्म्सने आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अद्वितीय डिजिटल सोल्यूशन्स वितरीत करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, ही भारताची पुढील मोठी संधी आहे. पिढीच्या बदलाकडे लक्ष वेधून अंबानी म्हणाले की, समूहाने दोन महत्त्वाच्या गोष्टी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये तरुण नेत्यांसह आरआयएलला सक्षम करणे आणि आरआयएलला नवीन प्रतिभा भांडवलाने समृद्ध करणे, यावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे अंबानी यांनी सांगितले.