सर्वसामान्यांना दिलासा! करांबाबात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; 5 लाखांपर्यंत भरावा लागणारा कर, आता 7 लाखापर्यंत भरावा लागणार नाही, जाणून घ्या कसे?

आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सामान्यांना दिलासा दिला आहे. करांबाबात अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पाहूया नेमका कशा प्रकारे भरावा लागणार वार्षिक उत्पन्न कर...

    नवी दिल्ली– आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करताना सामान्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची व मोठी घोषनी केली आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महागाई, बेरोजगारी, सतत इंधनाचे वाढत जाणारे भाव आदी आव्हानं सरकारसमोर असताना, आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सामान्यांना दिलासा दिला आहे. करांबाबात अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पाहूया नेमका कशा प्रकारे भरावा लागणार वार्षिक उत्पन्न कर…

    ७ लाख उत्पन्न असणाऱ्यांना कर नाही

    दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी रेल्वेसाठी, शेतीसाठी तसेच अन्य महत्वाच्या व मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, सर्वांच्या जीवनाचा भाग म्हणजे वार्षिक उत्पन्नातील वैयक्तिक कर याबाबत अर्थमंत्र्यांनी मोठा व लोकांच्या हिताच्या निर्णय घेतला आहे. आता सात लाखांपर्य़ंत ज्यांचे वार्षिक उत्पन्न आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, त्यामुळं नोकरदार, कामगार, कर्मचारी आदींना मोठा दिलासा मिळाला आहे

    पूर्वी 5 लाखांपर्यंत होता कर…

    आयकरांची मुदत यापूर्वी पाच लाखांपर्यत होती, म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाख असेल तर तुम्हाला कर भरावा लागयाच पण आता तुम्हाला ही मर्यादा सात लाखापर्यत गेली आहे, त्यामुळं नोकरदार, कामगार, कर्मचारी आदींना मोठा दिलासा मिळाला आहे