भारताला तेलपुरवठा करण्यात रशियाने सौदी अरेबियालाही टाकले मागे

    भारताला तेल निर्यातीच्या (Oil Export) बाबतीत रशियाने (Russia) सौदी अरेबियाला (Soudi Arabia) मागे टाकले आहे. आता रशिया हा भारताला तेलपुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. भारताला तेलाचा पुरवठा करण्यात इराण (Iran) सर्वात मोठा देश आहे.

    रशियाने मे महिन्यात भारताला दररोज सुमारे २५ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा केला. हे भारताच्या एकूण गरजेच्या १६ टक्के आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार (Importer) देश आहे. भारताला तेल पुरवण्याच्या बाबतीत सौदी अरेबिया आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

    भारतीय रिफायनरींना (Indian Refinery) मे महिन्यात रशियाकडून दररोज ८.१९ लाख बॅरल तेल मिळाले. कोणत्याही एका महिन्यात तेल मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. भारतीय कंपन्यांना एप्रिलमध्ये दररोज २.७७ लाख बॅरल तेल मिळाले. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक व्यापारी निर्बंध लादली. त्यामुळे अनेक देशांनी रशियाकडून तेल खरेदी केले नाही. याचा फायदा भारतीय कंपन्यांना झाला आणि त्यांनी मे महिन्यात विक्रमी तेल स्वस्त दरात आयात केले.