सनटेक रियल्टीचे विक्री बुकिंग वाढले ; तिसऱ्या तिमाहीत बुकिंग पोहोचली रु. 352 कोटींवर

विक्री- आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीत आमची संभाव्य विक्री तिमाही पातळीवर २९ टक्क्यांनी वाढून रू. ३५२ कोटी रुपयांवर गेली आणि आर्थिक वर्ष २२ च्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ती वार्षिक पातळीवर २३ टक्क्यांनी वाढून ८०० कोटी रुपयांवर गेली.

  मुंबई : सनटेक रियल्टीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीप्रमाणे, डिसेंबर २०२१ मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत त्याची विक्री बुकिंग वाढून ३५२ कोटी रुपये झाली आहे. एप्रिल-डिसेंबर 2021 दरम्यान, कंपनीची विक्री बुकिंग 23 टक्क्यांनी वाढून रु.800 कोटी झाली आहे. तर गेल्या वर्षी कंपनीने ६५१ कोटी रुपयांची बुकिंग केली होती.
  आर्थिक वर्ष २२ ची पहिली तिमाही आणि आर्थिक वर्ष २२ मधील नऊ महिन्यांच्या कालावधीतील महत्त्वाच्या घडामोडींची नोंद घ्यावी.

  विक्री- आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीत आमची संभाव्य विक्री तिमाही पातळीवर २९ टक्क्यांनी वाढून रू. ३५२ कोटी रुपयांवर गेली आणि आर्थिक वर्ष २२ च्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ती वार्षिक पातळीवर २३ टक्क्यांनी वाढून ८०० कोटी रुपयांवर गेली.

  वसुली – आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीतील वसुली तिमाही पातळीवर ३० टक्क्यांनी वाढून २७० कोटी रुपयांवर गेली, तर आर्थिक वर्ष २२ च्या नऊ महिन्यांच्या कालावधीत वार्षिक पातळीवर ४१ टक्क्यांनी वाढून ६४९ कोटी रुपयांवर गेली.

  त्याव्यतिरिक्त आर्थिक वर्ष २२ च्या नऊ महिन्यांतील वसुलीची कार्यक्षमता आर्थिक वर्ष २१ मधील ७१ टक्क्यांवरून वाढून ८१ टक्क्यांवर गेली आहे.

  इ) व्यवसाय विकास – गेल्या १८ महिन्यांत आम्ही वसई पश्चिम, वासिंद, बोरिवली पश्चिम, कल्याण (शहाड) आणि पेण- खोपोली भागातील संभाव्य पाच प्रकल्पांसाठी २३ दशलक्ष चौरस फुट जागा संपादन केली असून तिचे अंदाजे एकूण विकास मूल्य (जीडीव्ही) रू. २०,००० कोटी रुपये आहे.

  (रुपये कोटी) तिसरी 

  तिमाही 

  आर्थिक वर्ष २२

  दुसरी 

  तिमाही 

  आर्थिक वर्ष २२

  तिमाही 

  पातळी

  (टक्के)

  तिसरी 

  तिमाही 

  आर्थिक वर्ष २१

  नवमाही 

  आर्थिक 

  वर्ष २२

  नवमाही 

  आर्थिक 

  वर्ष २१

  वार्षिक 

  पातळी

  (टक्के)

  संभाव्य विक्री ३५२ २७२ २९ टक्के ३४९ ८०० ६५१ २३ टक्के
  ४१ टक्के २७० २०७ ३० टक्के २५२ ६४९ ४५९  ४१ टक्के

  कामगिरीचा सारांश

  उपरोक्त नमूद केलेली आकडेवारी तात्पुरत्या स्वरुपाची असून मर्यादित पुर्नपरीक्षणासाठी अधीन आहे.

  येत्या तिमाहींमध्ये नव्या संपादनांच्या मदतीने कंपनी प्रीमियम आणि महत्त्वाकांक्षी निवासस्थान क्षेत्रात नवे प्रकल्प लाँच करण्यासाठी सज्ज आहे. या लाँचेसमुळे कंपनीच्या संभाव्य- विक्रीमध्ये सातत्यपूर्ण वाढ होईल व पर्यायाने आमचा बाजारपेठेतील हिस्सा वाढेल.