मॅक्स लाईफची ‘रक्षक’ उपक्रमातून देशाच्या सशस्त्र दलांना मानवंदना

मॅक्स लाईफचा रक्षक हा उपक्रम म्हणजे मॅक्स लाईफच्या रक्षक टीममध्ये माजी लष्करी कर्मचारी, देशासाठी प्राण गमावलेल्या जवानांच्या पत्नी किंवा वीर नारी यांना सामावून घेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली : अनेक दशके भारतीय लष्कर ‘रक्षका’ची भूमिका बजावत आहेत. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित आणि संरक्षित आयुष्य देण्यासाठी आपले हे मूळ रक्षक संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण करतात. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. (“Max Life” / “Company”) आपल्या ‘रक्षक’ उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचे हे योगदान साजरे करत आहे. देशाच्या सशस्त्र दलांना या उपक्रमाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली.

मॅक्स लाईफचा रक्षक हा उपक्रम म्हणजे मॅक्स लाईफच्या रक्षक टीममध्ये माजी लष्करी कर्मचारी, देशासाठी प्राण गमावलेल्या जवानांच्या पत्नी किंवा वीर नारी यांना सामावून घेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. यातून या समुदायाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे हित जपले जाणार आहे. ४० कँटाँनमेंट्समध्ये रक्षकची उपस्थिती असल्याने लष्करी दलातील जवानांना माहिती आणि सुयोग्य आयुर्विमा योजना घेण्यासाठी संपर्क साधता येईल.

अंगद बेदी ‘रक्षक’ हा उपक्रमाचा चेहरा आहे. तो जवानांना त्यांचे धाडस, नि:स्वार्थी सेवा आणि देशाच्या सुरक्षेप्रती असलेली बांधिलकी यासाठी मानवंदना दिली आहे. त्याचवेळी, आकस्मिक संकटांमध्ये आपल्या कुटुंबाला आणि प्रियजनांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना आवाहनही केले आहे.

या उपक्रमाबद्दल संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी आलोक भान म्हणाले, “लष्करी दले म्हणजे राष्ट्राचा कणा आहेत आणि त्यांच्या सुरक्षेची खातरजमा करणे हा आपला प्राधान्यक्रम आहे. भारताची सशस्त्र दले आणि त्यांच्या नि:स्वार्थी सेवा आणि देशाप्रति व आपल्या प्रत्येकाप्रति असलेल्या बांधिलकीला आम्ही यंदाच्या स्वातंत्र्यदिनी रक्षकच्या माध्यमातून सलाम करत आहोत. ज्याप्रमाणे हे जवान आपल्याला आयुष्यातील संकटांपासून सुरक्षित ठेवतात, त्याचप्रमाणे मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या रक्षकसह लष्करातील जवान, ज्येष्ठ आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक संकटात सुरक्षित ठेवले जाईल, संरक्षण दिले जाईल, अशी आम्हाला आशा आहे. “

लष्करातील जवान आणि त्यांच्या प्रियजनांना कोणताही वाईट प्रसंग, युद्ध, युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित ठेवण्यासाठी मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या रक्षकमध्ये लष्कारी दलाच्या खास आर्थिक संरक्षण गरजा भागवण्यासाठी आणि कठीण काळातही त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्थिर आयुष्य जगता यावे, याची काळजी घेतली गेली आहे असेही भान म्हणाले.