भारतीय किचन्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आलेले सॅमसंग डिशवॉशर्स ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलदरम्‍यान लाँच करण्‍यात येणार; स्‍पेशल ऑफर्सचा लाभ घ्‍या

इंटेन्सिव्‍हवॉश प्रोग्रामची शक्‍ती असलेले हे डिशवॉशर्स कढाई, तसेच इतर कुकवेअरमधून ग्रीस, राहिलेले तेल, जळल्‍याचे डाग दूर करण्‍यासाठी विशेषत: भारतीय किचन्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आलेले आहेत. हे डिशवॉशर्स स्‍टेनलेस स्‍टील सिल्‍व्‍हर व व्‍हाइट रंगांसोबत अनुक्रमे ३८,९९० रूपये व ३५,९९० रूपये या विशेष किंमतीमध्‍ये येतात.

  • ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलदरम्‍यान १६ ते २० जानेवारी २०२२ पर्यंत स्‍पेशल ऑफर कालावधी
  • १८ महिन्‍यांसाठी नो कॉस्‍ट ईएमआयसह अतिरिक्‍त कॅशबॅक आणि जवळपास २,००० रूपयांपर्यंत सूट
  • 'नो क्‍वेश्‍नन्‍स आस्‍क्‍ड' परतावे

मुंबई : सॅमसंग (Samsung) या भारताच्‍या सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने घोषणा केली आहे की, ते १६ ते २० जानेवारी २०२२ पर्यंत ग्रेट रिपब्लिक डे सेलदरम्‍यान (Amazon Great Republic Day Sale) ई-कॉमर्स व्‍यासपीठ ॲमेझॉनवर त्‍यांचे फ्रीस्‍टॅण्डिंग डिशवॉशर्सचे दोन मॉडेल्‍स लाँच करणार आहेत.

इंटेन्सिव्‍हवॉश प्रोग्रामची शक्‍ती असलेले हे डिशवॉशर्स कढाई, तसेच इतर कुकवेअरमधून ग्रीस, राहिलेले तेल, जळल्‍याचे डाग दूर करण्‍यासाठी विशेषत: भारतीय किचन्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आलेले आहेत. हे डिशवॉशर्स स्‍टेनलेस स्‍टील सिल्‍व्‍हर व व्‍हाइट रंगांसोबत अनुक्रमे ३८,९९० रूपये व ३५,९९० रूपये या विशेष किंमतीमध्‍ये येतात.

ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon Great Republic Day Sale) (https://www.amazon.in/dp/B099FHFSSL) दरम्‍यान ग्राहक १८ महिन्‍यांसाठी १,९९९ रूपयांच्‍या नो कॉस्‍ट ईएमआयमध्‍ये डिशवॉशर्स खरेदी करू शकतात आणि जवळपास २,००० रूपयांची कॅशबॅक व सूट मिळवण्‍यासाठी पात्र ठरतील.

या ऑफर कालावधीदरम्‍यान खरेदी केलेले ग्राहक ‘नो क्‍वेश्‍चन्‍स आस्‍क्‍ड’ परताव्‍यांसाठी देखील पात्र ठरतील.

नवीन सॅमसंग डिशवॉशर श्रेणी घरातील कामे करण्‍यासोबत घरातूनच कार्यालयीन कामे करत असलेल्‍या लाखो व्‍यक्‍तींच्‍या वाढत्‍या समस्‍यांचे निराकरण करते. तसेच हायजिन वॉश वैशिष्‍ट्यासह ग्राहकांच्‍या स्‍वच्‍छताविषयक गरजांची पूर्तता देखील करते. हे वैशिष्‍ट्य राहिलेल्‍या अन्‍नामधून निर्माण होणारे जीवाणू ९९.९९ टक्‍के (इंटरटेकद्वारे प्रमाणित) दूर होण्‍याची खात्री देते.

या मॉडेल्‍समध्‍ये स्‍टेनलेस स्‍टील टब देखील आहे. या टबमधून कमी आवाज येतो आणि तो भांडी धुण्‍यासोबत निर्जंतुकीकरण करण्‍यासाठी उच्‍च तापमानावर नियंत्रण ठेवू शकतो.

सॅमसंगचे डिशवॉशर्स कूकर व कढाई यांसारख्या भारतीय कूकवेअरला प्रभावीपणे स्‍वच्‍छ करतात आणि १३ प्‍लेस सेटिंग्‍जसह येतात, जे एकाच वॉश चक्रामध्‍ये विविध व मोठ्या आकाराच्‍या डिशेस् सामावून घेऊ शकतात.

हाइट ॲडजस्‍टमेंट वैशिष्‍ट्य भारतीय किचन्‍समध्‍ये सामान्‍यत: दिसून येणारी मोठी भांडी व तवे सुलभपणे सामावून घेते.

”ग्राहक त्‍यांची जीवनशैली अद्ययावत करण्‍यासोबत त्‍यांच्‍या लिव्हिंग स्‍पेसेसमध्‍ये बदल करत आहेत. यामध्‍ये किचनचा देखील समावेश आहे, जे भारतीय घरांमधील प्रमुख स्‍थान आहे. सॅमसंगचे डिशवॉशर्स इंटेन्सिव्‍हवॉश सह संचालित आहेत आणि विशेषत: भारतीय किचन्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. हे डिशवॉशर्स अद्वितीय सोयीसुविधा व स्‍वच्‍छता देतात. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ॲमेझॉनवर उपलब्‍ध असलेली ही नवीन श्रेणी ग्राहकांना त्‍यांची जीवनशैली अद्ययावत करण्‍यामध्‍ये मदत करेल आणि विशेषत: घरातील कामे करण्‍यासोबत घरातूनच कार्यालयीन काम करत असण्‍याच्‍या काळामध्‍ये त्‍यांना उच्‍चस्‍तरीय सोयीसुविधा देईल,” असे सॅमसंग इंडियाच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या ऑनलाइन बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक संदीप सिंग अरोरा म्‍हणाले.

ठळक वैशिष्‍ट्ये:

१३ प्‍लेस सेटिंग्‍ज

सॅमसंगच्‍या डिशवॉशर्समध्‍ये सहा सदस्‍य असलेल्‍या कुटुंबासाठी अनुकूल असे १३ प्‍लेस सेटिंग्‍ज आहेत, जे एकाच वॉश चक्रामध्‍ये विविध व मोठ्या आकाराच्‍या डिशेस् सामावून घेऊ शकतात.

इंटेन्सिव्‍हवॉश

इंटेन्सिव्‍हवॉश वैशिष्‍ट्य भांडी, तवा, कढाई व कूकर्सवरील गडद डाग स्‍वच्‍छ करण्‍यामध्‍ये मदत करते. हे वैशिष्‍ट्य कूकवेअर, डिशेस् व भांड्यांवरील ग्रीस, राहिलेले तेलाचे डाग, जळलेले डाग आणि अन्‍न शिजवल्‍यामुळे राहिलेले डाग दूर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हायजिन वॉश अंतिम रिन्‍स वाढवण्‍यासोबत भांडी स्‍वच्‍छ धुण्‍यासाठी तापमान ७० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवते. इंटेन्सिव्‍हवॉश प्रोग्रामचा वापर केल्‍यास ते ९९.९९ टक्‍के जीवाणूंना नष्‍ट करते. ज्‍यामुळे डिशेस्, कटलरी व भांडी वापरण्‍यास सुरक्षित असण्‍याची खात्री मिळते.

स्‍टेनलेस टब

तुमचा डिशवॉशर नेहमीच नवीन दिसेल. स्‍टेनलेस स्‍टील टब अधिक टिकाऊ, शांतमय असून पारंपारिक डिशवॉशर्सच्‍या तुलनेत अधिक स्‍वच्‍छ राहतो. या डिशवॉशरमधून कमी आवाज येतो आणि भांडी स्‍वच्‍छ करण्‍यासोबत निर्जंतुकीकरण करताना उच्‍च तापमानावर नियंत्रण ठेवू शकता. तसेच डिशवॉशरचा रंग न जाण्‍याची खात्री मिळण्‍यासोबत दुर्गंधी निर्माण होण्‍याला प्रतिबंध होतो.

हाइट ॲडजस्‍टमेंट

हाइट ॲडजस्‍टमेंट वैशिष्‍ट्य डिशवॉशरमध्‍ये मोठ्या आकाराची भांडी ठेवण्‍याची सुविधा देते. वरील व खालील रॅक सुलभपणे समायोजित करता येऊ शकतो, ज्‍यामुळे वरील रॅकवर ओरखडे निर्माण न होता किंवा धक्‍का न बसता रॅक्‍समध्‍ये मोठ्या आकाराची कढई व तवा सहजपणे मावू शकतात.

स्‍मार्ट लीकेज सेन्‍सर

स्‍मार्ट लीकेज सेन्‍सर कोणत्‍याही पाणी गळतींपासून संरक्षण करते. हे वैशिष्‍ट्य पाणी गळती होत असल्‍याचे दिसून आले की त्‍वरित चक्र थांबवते, पाणी उत्‍सर्जित करते आणि एरर मॅसेज दाखवते.

व्‍यापक एलईडी डिस्‍प्‍ले

मोठ्या व व्‍यापक एलईडी डिस्‍प्‍लेसह डिश स्‍वच्‍छ धुण्‍याच्‍या सुलभ व सर्वोत्तम मार्गाचा आनंद घ्‍या. या डिस्‍प्‍लेवर सुलभपणे वाचन करण्‍याची सुविधा मिळते. तुम्‍ही दूरूनच क्षणात स्थिती, सेटिंग्‍ज, उर्वरित वेळ व सायकल प्रोसेस तपासू शकता. ज्‍यामुळे तुम्‍ही वॉशिंग कामगिरीवर प्रभावीपणे देखरेख ठेवण्‍यासोबत नियंत्रण ठेवू शकता.

फिंगरप्रिंट रेसिस्‍टण्‍ट फिनिश

फिंगरप्रिंट रेसिस्‍टण्‍ट फिनिश भांड्यांच्‍या पृष्‍ठभागाचे बोटांचे ठसे, तसेच इतर डाग व धब्‍ब्‍यांपासून संरक्षण करते. आणि बोटांचे ठसे किंवा डाग दिसल्‍यास ते सहजपणे स्‍वच्‍छ करता येऊ शकतात. ज्‍यामुळे तुमचे घर अधिक आकर्षक दिसेल.