भारताला आपली शाश्वत विकासाची निर्धारित वचने पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी श्नेडर इलेक्ट्रिकने सुरू केला ग्रीन योद्धा उपक्रम

भारताकडे औद्योगिक कामांसाठी उभारल्या गेलेल्या पायाभूत सोयीसुविधांची भक्कम यंत्रणा आहे व ती चालविण्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज भासत असते. आयपीपीसीच्या सहाव्या मूल्यांकन अहवालानुसार हा देश सर्वाधिक हरितगृहवायू उत्सर्जित करणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे व ऊर्जानिर्मितीसाठी तो अजूनही कोळसा आणि तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

  • शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रणी संस्था हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सघन कृती करण्यास प्रोत्साहित करणार व भारताच्या विशिष्ट गरजांनुसार जागरुकता कार्यक्रम राबविणार
  • SE उद्दीष्टांबरहुकुम आणि ग्राहक व पुरवठादारांच्या कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठीच्या प्रवासात त्यांची मदत करण्याप्रती आपली बांधिलकी जपण्यासाठी उपक्रमाची घोषणा

मुंबई : व्यापारी संस्था, उद्योग आणि व्यक्तींनी एकत्र येऊन पर्यावरणरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशनच्या क्षेत्रामध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नांमध्ये अग्रस्थानी असलेल्या श्नेडर इलेक्ट्रिकने (Schneider Electric) नुकतीच भारतामध्ये ‘ग्रीन योद्धा’ या संवादाद्वारे शाश्वत विकासाचा पुरस्कार करणाऱ्या उपक्रमाची सुरुवात केली. भारत सरकारने सीओपी२६ या पर्यावरण बदलाविषयीच्या परिषदेमध्ये व्यक्त केलेल्या बांधिलकीला पाठबळ देण्यासाठी हे कंपनीने कृतीसाठीची ही निकडीची हाक दिली आहे.

भारताकडे औद्योगिक कामांसाठी उभारल्या गेलेल्या पायाभूत सोयीसुविधांची भक्कम यंत्रणा आहे व ती चालविण्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज भासत असते. आयपीपीसीच्या सहाव्या मूल्यांकन अहवालानुसार हा देश सर्वाधिक हरितगृहवायू उत्सर्जित करणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे व ऊर्जानिर्मितीसाठी तो अजूनही कोळसा आणि तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. २०२१ ते २०३० या कालावधीमध्ये भारत अंदाजित कार्बन उत्सर्जन १ बिलियन टनांनी (जीटी) कमी करेल, अशी घोषणा भारताचे पंतप्रधान श्री. मोदी यांनी सीओपी२६ मध्ये केली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिमेंट, लोखंड आणि स्टील, व्यावसायिक आणि औद्योगिक इमारती, अ-धातू खनिजे आणि रसायननिर्मिती या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करणा-या क्षेत्रांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे हे सामायिक लक्ष्य साध्य करण्यासाठीच्या या प्रयत्नांत सामील व्हावे, असे आवाहन श्नेडर इलेक्ट्रिक करत आहे.

Corporate Knights कडून श्नेडर इलेक्ट्रिकला World’s most sustainable corporation in 2021 चे मानांकन मिळविणारी श्नेडर इलेक्ट्रिक पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन अर्थात ईएसजी तत्त्वांचे पालन करणारी संस्था आणि आपल्या ग्राहकांच्या शाश्वत विकास व कार्यक्षमतेचे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रवासातील डिजिटल सहकारी म्हणून आपल्या विशेष स्थानाचा वापर करत हा उपक्रम सुरू करत आहे. हा उपक्रम परिणामकारक कार्बनमुक्ततेचे तसेच सस्वसमावेशक ऊर्जा परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त करणा-या व्यक्ती, संस्था आणि कार्यपद्धतींना प्रकाशझोतात आणणार आहे.

ग्रीन योद्धा उपक्रमाबद्दल श्नेडर इलेक्ट्रिकचे अभिनंदन करताना नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले, “उद्योगसंस्थांनी ऊर्जेचा कार्यक्षमतेने वापर करावा आणि कार्बन उत्सर्जन कमी करावे यासाठी त्यांना ऊर्जा उपाययोजनांची आखणी करून देण्याच्या हेतूने ग्रीन योद्धासारखा एक कार्यक्रम श्नेडर इलेक्ट्रिकने तयार केला आहे, याचा मला आनंद आहे. अधिक पर्यावरणस्नेही भविष्यकाळ प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आणि २०३० पर्यंत एसडीजी लक्ष्ये साध्य करण्यासाठी एक देश म्हणून आपण एकजुटीने काम केले पाहिजे. ऊर्जा आणि संसाधनांचा जास्तीत-जास्त कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी सर्वांना सक्षम करण्याचे आणि त्याद्वारे प्रगती व शाश्वत विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य बाळगून ग्रीन योद्धा उपक्रम तयार केल्याबद्दल मी श्नेडर इलेक्ट्रिकचे अभिनंदन करतो.”

एक ग्रीन योद्धा बनण्याची शपथ वाहताना जेके सिमेंट लिमिटेडचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ माधव सिंघानिया म्हणाले, “आपल्या पृथ्वीच्या संरक्षणाकरता आपण २०३० पर्यंत ७५ टक्‍के हरित ऊर्जा वापरण्याचे आणि सिमेंटसारख्या उत्पादनांच्या निर्मितीतून होणारे कार्बन डायऑक्‍साईड उत्सर्जनाचे कठोर लक्ष्य निर्धारित केले आहे. हे ध्येय वास्तवात उतरविण्याच्या दृष्टीने ऊर्जा आणि इंधनाचा पुरेपूर वापर करण्यासाठी, ऊर्जा मापनाच्या सर्व साधनांचे अखंडितपणे एकात्मिकीकरण करण्यासाठी, डिजिटायझेशनच्या उपाययोजना अंगिकारण्यासाठी आणि विद्युत वितरण, नियंत्रण तसेच ही यंत्रणा स्वयंचलित बनविण्यासाठी एक एकात्मिक सर्वव्यापी उपाययोजना कार्यरत करण्यासाठी श्नेडर इलेक्ट्रिकच्या इकोस्‍ट्रक्‍चर (EcoStruxure) सेवेशी भागीदारी केली आहे.”

“हवामान संकटाशी सामना करण्यासाठी समर्पित नेतृत्व आणि वैश्विक कृतीची गरज आहे, असे मला वाटते. यासाठीच्या प्रयत्नांचे उदाहरण घालून देणे आणि बदलांना कृतीमध्ये उतरविणे ही आपली सामायिक जबाबदारी आहे. ग्रीन योद्धा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल मी श्नेडर इलेक्ट्रिकचे अभिनंदन करतो. यूएसटीमध्ये आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांच्या आणि जनसमुदायाच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याप्रती कटिबद्ध आहेत. यूएसटी सुद्धा एक ग्रीन योद्धा आहे याचा मला अभिमान आहे.” यूएसटीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि कंट्री हेड-इंडिया श्री अलेक्झांडर व्हर्गिंस म्हणाले.

श्नेडर इलेक्ट्रिकने स्वत: सुद्धा शाश्वत विकासाच्या दृष्टीने कठोर शाश्वत आणि स्थानिक स्तरावरील प्रयत्नांप्रती आपली कठोर वचनबद्धता जाहीर केली आहे. यात २०२५ पर्यंत ग्राहकांसाठी ८०० मेट्रिक टन कार्बन डायऑक्‍साईड उत्सर्जनाची वाचविणे व टाळणे आणि आपल्या १००० पुरवठादारांनी २०२५ पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण निम्म्यावर आणावे यासाठी त्यांची मदत करणे यासाठीच्या उपाययोजनांचा समावेश आहे. याखेरीज ५ कोटी लोकांपर्यंत उपलब्ध करून देण्याचे आणि सर्वांसाठी प्रगती व शाश्वततेमध्ये समन्वय साधण्याच्या आपल्या हेतूबरहुकुम १० लाख लोकांना ऊर्जा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्यही कंपनीने आखले आहे.

श्नेडर इलेक्ट्रिकच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्याप्रती असलेल्या कटिबद्धतेविषयी बोलताना श्नेडर इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि.चे एमडी आणि सीईओ व ग्रेटर इंडियाचे झोन प्रेसिडंट अनिल चौधरी म्हणाले, “भारताचे कार्बन उत्पादन शून्यावर आणण्याप्रती पंतप्रधान मोदी यांनी सीओपी२६ मध्ये याआधीच व्यक्त केलेल्या कटिबद्धतेचे आम्ही स्वागत करतो. श्नेडर इलेक्ट्रिकमध्ये आम्हाला असे वाटते की, अधिक पर्यावरणस्नेही आणि अधिक न्याय्य अर्थव्यवस्थेसाठीच्या या स्पर्धेमध्ये खासगी क्षेत्र हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच या तत्त्वांना अनुसरणारी आणि त्यातून ऊर्जास्नेही कार्यपद्धती वास्तवात उतरविण्याच्या कामी सक्रियतेने काम करणारी संस्था म्हणून आम्ही या बदलांचे सातत्याने नेतृत्व करत आलो आहोत. ग्रीन योद्धा कार्यक्रमातून आम्ही सर्व समविचारी, विवेकी संस्थांना चांगला लढा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहोत आणि ऊर्जानिर्मितीच्या साधनांमधील सकारात्मक परिवर्तनाला वेग देत आपल्या पृथ्वीचे यशस्वीरित्या संरक्षण करण्याच्या कामी आमची साथ देणा-या संस्थांचे कौतुक करण्याची आमची इच्छा आहे. आमच्याबरोबर ग्रीन योद्धा बनल्याबद्दल आम्ही जेके सिमेंट आणि यूएसटी याचे अभिनंदन करतो. आम्ही आपल्या सर्वांना आमच्याबरोबर ग्रीन योद्धा बनण्याचे आमंत्रण देत आहोत!”

भारतात व जगभरात श्नेडर इलेक्ट्रिक इकोस्‍ट्रक्‍चर प्‍लॅटफॉर्मद्वारे समर्थित डिजिटल उत्‍पादने, सेवा व सोल्‍यूशन्‍सच्‍या परिपूर्ण पोर्टफोलिओचा लाभ घेते. हे व्‍यासपीठ आयओटी-सक्षम, प्‍लग-ॲण्‍ड-प्‍ले, खुले असण्‍यासोबत त्‍यामध्‍ये इंटरऑपरेबल सॉफ्टवेअर आधारित रचना आहे. ज्‍यामुळे ग्राहकांच्‍या स्थिरता व ऊर्जा कार्यक्षमता ध्‍येयांसंदर्भातील गरजांची पूर्तता होते. कंपनीची सर्व उत्‍पादने इको-डिझाइन दृष्टिकोनासह निर्माण केली जातात. ही उत्‍पादने सुलभपणे दुरूस्त, अद्ययावत करण्‍यासोबत जीवनकाळ संपताच नष्‍ट करता येतात. त्‍यांच्‍या इकोफिट सेवा संपूर्ण यंत्रणा बदलण्‍याऐवजी फक्‍त विशिष्‍ट प्रमुख घटकांना बदलत उपकरण अद्ययावत करण्‍याची सुविधा देतात.

• आमचा ग्रीन प्रि‍मिअम उपक्रम उत्‍पादने प्रॉडक्‍ट एन्‍व्‍हायरोन्‍मेंट प्रोफाइल्‍स (पीईपी), एण्‍ड-ऑफ-लाइफ इन्‍स्‍ट्रक्‍शन्‍स (ईओएलआय) सह येण्‍याची आणि आरओएचएच व रीच यासारख्‍या जागतिक नियमनांचे पालन करण्‍याची खात्री घेतो.

• आमच्‍या हवामानावर सकारात्‍मक परिणाम करणा-या नवोन्‍मेष्‍काराला नेहमी मान्‍यता मिळते, जसे एसएफ६-फ्री स्विचगिअर टेक्‍नोलॉजी (SF6-free switchgear technology), जे औद्योगिक उत्‍पादनांमध्‍ये घातक ग्रीनहाऊस वायूला शुद्ध हवेमध्‍ये बदलते, ज्‍यामुळे विभागातील नवोन्‍मेष्‍काराचा दर्जा उंचावतो.

अगदी नुकतेच एसईने त्‍यांची स्थिर सल्‍लागार शाखा सुधारित करण्‍याची देखील घोषणा केली आहे (SE has also announced reinforcing its sustainability consulting arm), ज्‍याद्वारे ऊर्जा व स्थिरता, हवामान बदल आणि पुरवठा साखळी सहभाग सल्‍लागार सेवांमधील अद्वितीय कौशल्‍यांचा अनुभव घेण्‍यास उत्‍सुक असलेल्‍या अधिकाधिक ग्राहकांना पाठिंबा देण्‍यात येईल.

ग्रुप सीओपी२६ मध्‍ये देखील उपस्थित होता, जेथे ग्रुपला विविध प्रमुख पॅनेल्‍ससमोर पॅरिस ॲग्रीमेंटमध्‍ये स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या १.५ अंश प्रक्षेपणाची पूर्तता करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या सोल्‍यूशन्‍सबाबत आपले मत व्‍यक्‍त करण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात आले. यादरम्‍यान ग्रुपने त्‍यांचा जागतिक डिकार्बनायझेशन अहवाल ‘बॅक टू २०५० (Back to 2050), आपल्‍याला वाटते त्‍यापेक्षा १.५ अधिक व्‍यवहार्य आहे’च्‍या माध्‍यमातून माहिती दिली.