५.७५ कोटी परत करा ७ कंपन्यांना सेबीचा आदेश

सेबीने एवेंटिस बायोफीड्स प्राइवेट लिमिटेड, नविन्या मल्टीट्रेड प्राइवेट लिमिटेड, यूनी२४ टेक्नो सॉल्यूशंस, सनमेट ट्रेड, श्रेयांस क्रेडिट एंड कॅपिटल, बैतूल ऑयल्स एंड फीड्स व बैतूल मिनरल्स एंड कंस्ट्रक्शंसला लाभांशाची रक्कम व्याजसह परत करण्याचे आदेश दिले आहेत.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुंबई.

    बाजार नियमाक संस्था सेबीने बाबा रामदेव यांच्या रुची सोयाच्या शेअर्समध्ये घोळ केल्याच्या आरोपावरून मोठी कारवाई केली आहे. सेबीने सात कंपन्यांना रुयी सोयाच्या शेअर्समध्ये झालेल्या घोळावरून प्राप्त झालेले ५२.७५ कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत.

    यासोबतच या कंपन्यांना २८ सप्टेंबर २०१२ पासून प्राप्त केलेली रक्कम १२ टक्के व्याजासह जमा करण्याचेही आदेश दिले. सेबीने एवेंटिस बायोफीड्स प्राइवेट लिमिटेड, नविन्या मल्टीट्रेड प्राइवेट लिमिटेड, यूनी२४ टेक्नो सॉल्यूशंस, सनमेट ट्रेड, श्रेयांस क्रेडिट एंड कॅपिटल, बैतूल ऑयल्स एंड फीड्स व बैतूल मिनरल्स एंड कंस्ट्रक्शंसला लाभांशाची रक्कम व्याजसह परत करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या होत्या. त्यावेळीच पतंजलीने रुची सोयाची खरेदी केली होती.