Mumbai Municipal Corporation will raise money from the stock market

शेअर बाजारात(share market) सुरू असलेल्या पडझडीला मंगळवारी ब्रेक लागला. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर(share market up by 280 points) २८० अंशाने वधारला.

    मुंबई: शेअर बाजारात(share market) सुरू असलेल्या पडझडीला मंगळवारी ब्रेक लागला. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर २८० अंशाने वधारला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आज वधारले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २८०.१५ अंशाने वधारून ५००५१.४४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ७८.३५ अंशाने वधारून १४८१४.७५ वर स्थिरावला.

    वित्तीय कंपन्यांचे शेअर वधारल्याने जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती असूनही देशातील शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चक्रवाढ व्याज माफीचा निर्णय सर्वांसाठी लागू करण्याचा पुनरुच्चार केला आहे. मात्र, त्याचा अतिरिक्त भार कोणी सहन करावा, याबाबत संदिग्धता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

    अल्ट्राटेक सिमेंटचे सर्वाधिक सुमारे ३ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टायटन, ॲक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मारुतीचे शेअर वधारले आहेत. तर ओएनजीसी, पॉवरग्रीड, आयटीसी, एनटीपीसी, एम अँड एम आणि एचडीएफसीचे शेअर घसरले.