share market update

आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) ४८८ अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) १६२ अंकांनी वधारला.

    मुंबई: शेअर बाजारात बुधवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा शेअर बाजार वधारला (Share Market Update) आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) ४८८ अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) १६२ अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये आज ०.९४ टक्क्याची वाढ होऊन तो ५२,३११ अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये १.०६ टक्क्यांची वाढ होऊन तो १५,५७६ अंकावर पोहोचला.

    आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५० अंकांनी वधारत ५१,९७२.७५ अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३८ अंकांची उसळण दिसून आली. निफ्टी १५,४५१.५५ च्या पातळीवर खुला झाला होता. बुधवारी शेअर बाजारात घसरण असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली आहे.

    आज शेअर बाजार बंद होताना २०३७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर ११८८ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज १२३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज डॉलरच्या तुलनेत रुपया काहीसा वधारला असून रुपयाची आजची किंमत ही ७८.३१ इतकी आहे. बुधवारी रुपयाची किंमत ही ७८.३८ इतकी होती.