share market update

आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (Share Market Update) निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७०९ अंकांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये २२५ अंकांची घसरण झाली आहे.

    मुंबई: एकिकडे महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार कोसळतंय की काय असा प्रश्न उपस्थित झाला असताना शेअर बाजारात आज घसरण झाली. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (Share Market Update) निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) ७०९ अंकांची घसरण झाली आहे. तसेच निफ्टीमध्ये (Nifty) २२५ अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये १.३५ टक्क्यांची घसरण होऊन तो ५१,८२२ अंकांवर आला आहे. याशिवाय निफ्टीमध्ये १.४४ टक्क्यांची घसरण होऊन तो १५,४१३ अंकावर स्थिरावला.

    शेअर बाजार बंद होताना १२१८ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. शेअर बाजारात २०२५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज १०५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

    आज जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅपमध्ये १.५ टक्के तर स्मॉल कॅपमध्ये १ टक्क्याची घसरण झाली आहे. मेटल क्षेत्रातल्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर बाजार बंद होतांना हिंदाल्को इंडस्ट्रीज, युपीएल, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि विप्रो यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर पीसीएल, हीरो मोटोकॉर्प, टीसीएस, मारुती सुझुकी आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीमध्ये विक्रमी घसरण झाली आहे. आज रुपयाची किंमत ७८.३८ इतकी झाली आहे.