share market update

शेअर बाजारात (Share Market Update) चौफेर घसरण नोंदविली गेली. रिझर्व्ह बँकेने रेपो दर फेररचने संबंधित केलेल्या घोषणेमुळे बाजारात घसरण दिसून आली. प्रमुख स्टॉक्समध्ये शेअर विक्रीचे सत्र दिसून आलं.

    नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील (Share Market Update) घडामोडींचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आले. शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्स व निफ्टी १.५ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती ही घसरणी मागील प्रमुख कारण सांगितली जात आहे. आज शेअर बाजारात सेन्सेक्स ८६६.६५ अंक किंवा १.५६ टक्क्यांच्या घसरणीसह ५४,८३५.५८ वर बंद झाला. निफ्टी १११५.८ अंक किंवा २ टक्क्यांच्या घसरणीसह ५४,५८६.७५ च्या टप्प्यावर बंद झाला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo Rate Hike) वाढ करण्याची घोषणा केली आहे. गृहकर्ज मागणीचा दर (Home Loan rate) मंदावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बांधकाम क्षेत्र संबंधित निर्देशांकात देखील आज घसरण दिसून आली.

    बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, विप्रो, एचडीएफसी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट शेअर्स मध्ये घसरण नोंदविली गेली. तर महिंद्रा, पॉवरग्रिड, आयटीसी, स्टेट बँक आणि एनटीपीसीमध्ये वाढ नोंदविली गेली. आजच्या व्यवहारात छोट्या शेअरमध्ये सर्वाधिक नुकसान पाहण्यास मिळालं. स्मॉलकॅप १०० पैकी २.५३ टक्के घसरण नोंदविली गेली. स्मॉलकॅप ५० मध्ये २.४ टक्के आणि स्मॉलकॅप २५० मध्ये २.२७ टक्के घसरण नोंदविली गेली.

    शेअर बाजारात चौफेर घसरण नोंदविली गेली. रिझर्व्ह बँकेने रेपो दर फेररचने संबंधित केलेल्या घोषणेमुळे बाजारात घसरण दिसून आली. प्रमुख स्टॉक्समध्ये शेअर विक्रीचे सत्र दिसून आलं. रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात ०.४ टक्के वाढीची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेची फेररचनेचा सर्वांना अनेपक्षित धक्काच होता. एप्रिलनंतर जून महिन्यात फेररचनेचा आढावा घेतला जाणार होता. मात्र, तत्पपूर्वीच रिझर्व्ह बँकेने घोषणा केली आहे.