
गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत शेअर बाजारात (Share Market Update) आज नोंदविली गेलेली तेजी कमी ठरली. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स ८६ अंकांच्या वाढीसह ५५,५५०.३० च्या टप्प्यावर आणि निफ्टी ३५ अंकांच्या वाढीसह १६६३० वर बंद झाला. आज शेअर बाजारात सर्वाधिक कामगिरी फार्मा सेक्टर (Pharma Sector) मध्ये दिसून आली.
नवी दिल्ली : शेअर बाजारात (stock market today)सलग चौथ्या दिवशीचं तेजी नोंदविली गेली. आज (शुक्रवारी) प्रमुख इंडेक्स (Sensex and nifty) सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद झाले. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत शेअर बाजारात आज नोंदविली गेलेली तेजी कमी ठरली. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स ८६ अंकांच्या वाढीसह ५५,५५०.३० च्या टप्प्यावर आणि निफ्टी ३५ अंकांच्या वाढीसह १६६३० वर बंद झाला. आज शेअर बाजारात सर्वाधिक कामगिरी फार्मा सेक्टर (Pharma Sector) मध्ये दिसून आली. ऑटो सेक्टर घसरणीसह बंद झाले. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्समध्ये २७०० अंकांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात आज ट्रेडिंगच्या सुरुवातीला घसरण नोंदविली गेली. त्यानंतर नीच्चांकी स्तरावर शेअर्सच्या खरेदीवर जोर दिसून आला.
आज बीएसई वर ट्रेडिंग होणाऱ्या ३४५८ शेअर्सपैकी २०७६ शेअर तेजीसह बंद झाले. तर १२६३ स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. तर ११९ स्टॉकची कामगिरी स्थिर राहिली. आज १५ स्टॉक मध्ये अप्पर सर्किट आणि ४स्टॉक मध्ये लोअर सर्किट दिसून आले. आजच्या तेजीसह बीएसई वर लिस्ट (सूचीबद्ध) सर्व कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य २५३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
बुधवारी ट्रेडिंगदरन्यान सेन्सेक्सवर रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक ५.२४ टक्क्यांच्या वाढीसह २३५३.८ च्या स्तरावर बंद झाला. केवळ एकाच दिवसात कंपनीच्या स्टॉकमध्ये ११७ रुपयांची वाढ नोंदविली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात स्टॉक २२३६.७० च्या टप्प्यावर बंद झाला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक निफ्टीमध्ये सहभागी ५० स्टॉक मध्ये सर्वाधिक तेजी नोंदविणारा स्टॉक ठरला आहे. आजच्या वाढीसह बीएसई कंपनीचे बाजार मूल्य १५,९२,३०४ कोटींवर पोहोचले आहे. काल (मंगळवारी) कंपनीचे बाजारमूल्य १५,१३,०८७ रुपयांच्या स्तरावर होते.