share market fall

आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून शेअर बाजारामध्ये मोठी घसरण होत आहे. बुधवारीही सकाळपासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. अनेक कंपन्यांचे 8 दिवसांत 21 लाख कोटी बुडाले; आहेत. TCS, Reliance, Adani, HDFC कंपन्यांचे जबरदस्त नुकसान झाले आहे(Shares of TCS, Reliance, Adani, HDFC fell sharply).

  मुंबई : आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून शेअर बाजारामध्ये मोठी घसरण होत आहे. बुधवारीही सकाळपासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. अनेक कंपन्यांचे 8 दिवसांत 21 लाख कोटी बुडाले; आहेत. TCS, Reliance, Adani, HDFC कंपन्यांचे जबरदस्त नुकसान झाले आहे(Shares of TCS, Reliance, Adani, HDFC fell sharply).

  बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक सेन्सेक्स 276.46 अंकानी घसरत 54,88.39 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 72.95 अंकानी घसरुन 16,167.10 वर बंद झाला. शेअर बाजारात घसरणीचे सत्र मागील आठवड्यापासून सुरू आहे.

  बुधवारी सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 75.91अकांनी खाली घसरला तर निफ्टीने 16,230 वर सुरवात केली. दुपारच्या सत्रात तर सेन्सेक्स तब्बल 700 अंकांपर्यंत कोसळला होता. मात्र, दिवसअखेर सावरत 276 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. शेअर बाजारात गेल्या आठ दिवसापासून अस्थिरता कायम आहे. मंगळवारीही शेअर बाजार घसरणीसह अर्थात लाल चिन्हात बंद झाला.

  संमिश्र जागतिक संकेतांमुळे एफएमसीजी आणि बँक वगळता सर्व सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. शेवटी, सेन्सेक्स 105.82 अंकांनी अर्थात 0.19 टक्क्यांनी घसरून 54,364.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 61.80 अंकांनी अर्थात 0.38 टक्क्यांनी घसरून 16,240.05 वर बंद झाला.

  यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.

  8 दिवसांत 21 लाख कोटी बुडाले

  एप्रिलच्या सुरुवातीपासून देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीचा कल आता तीव्र झाला आहे. 28 एप्रिल ते 10 मे या अवघ्या 8 व्यापार दिवसांत कंपन्यांचे बाजार भांडवल 21 लाख कोटी रुपयांनी घसरले. यादरम्यान सेन्सेक्स 3,157 अंकांनी घसरला. 28 एप्रिल 2022 रोजी सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 269.47 लाख कोटी रुपये होते, जे 10 मे रोजी घसरून 248.32 लाख कोटी रुपये झाले. यादरम्यान बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स 57,521 अंकांनी घसरून 54,364 वर आला. या काळात अदानी समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फटका बसला. यापूर्वी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या अदानी विल्मारचे शेअर्स सलग पाचव्या दिवशी घसरले.