चांदी ८० हजार रुपयांवर आणि सोनं ५५ हजारांवर? या कारणांमुळे वाढतायत भाव

कोरोना व्हायरसचं बदललेलं स्वरूप आणि नव्या व्हायरससाठी नवी लस येण्यासाठी लागू शकणारा संभाव्य वेळ या कारणांमुळे सोनं आणि चांदीच्या किंमती वाढू लागल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. अमेरिकेत गुंतवणुकीवरील व्याजदर स्थिर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या हालचालींमुळेदेखील हे घडत असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

मौल्यवान धातू असणारे सोने आणि चांदी यांचे दर नेहमीच वाढत असतात. पण यावेळी दर वाढण्याच्या प्रक्रियेत एक फरक जाणवतोय.

दरवेळी सोन्याचे भाव अधिक वेगाने वाढतात. त्यामानाने चांदीचा दर कमी वेगाने वाढत असतो. मात्र यावेळी चांदीचा दर सोन्यापेक्षाही अधिक वेगाने वाढत असल्याचं दिसतंय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या प्रति १० ग्रॅम किंमतीत २००० रुपयांची वाढ झालीय. तर चांदीचा भाव किलोमागे तब्बल ७००० रुपयांनी वधारलाय.

कोरोना व्हायरसचं बदललेलं स्वरूप आणि नव्या व्हायरससाठी नवी लस येण्यासाठी लागू शकणारा संभाव्य वेळ या कारणांमुळे सोनं आणि चांदीच्या किंमती वाढू लागल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. अमेरिकेत गुंतवणुकीवरील व्याजदर स्थिर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या हालचालींमुळेदेखील हे घडत असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

याबाबतचं आपलं मत नोंदविण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढील काही दिवसांत चांदीचे भाव ८० हजार प्रतिकिलो तर सोन्याचे प्रति १० ग्रॅमचे भाव ५५ हजारांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. बुधवारी मुंबईत सोन्याचा भाव ५० हजार १००, तर चांदीचे प्रतिकिलो भाव ६६ हजार असे होते.

चांदीचे भाव का वाढतायत?

जागतिक बाजारात चांदीतील गुंतवणूक वाढत आहे. त्याचबरोबर सट्टेबाजही चांदी खरेदी करणं पसंत करत असल्याचं चित्र आहे. औद्योगिक क्षेत्रातूनदेखील चांदीची मागणी वाढत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे चांदीचे भाव वाढायला सुरुवात झालीय.

तेजीचं वर्ष

२०२० हे वर्ष विविध क्षेत्रांसाठी हानीकारक ठरलं असलं तरी सोनं आणि चांदीसाठी मात्र चांगलंच फलदायी ठरलंय. जानेवारी ते मार्च या काळात सोनं आणि चांदीचे भाव जोरदार वाढले. त्यानंतरचे काही महिने भाव स्थिर राहिले. त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या भावात उसळी पाहायला मिळत आहे.