sbi mclr rate change

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) दुसऱ्यांदा एमसीएलआरमध्ये (MCLR) वाढ केली आहे. स्टेट बँकेने ०.१० टक्क्यांची म्हणजेच १० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. सगळ्या कर्जांसाठी हा दर लागू होणार आहे.

    स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँकेच्या (SBI) कर्जाचा हप्ता (EMI) आता महागणार आहे. स्टेट बँकेने पुन्हा एकदा एमसीएलआर (Marginal Costs of Fund-Based Lending Rate ) (MCLR) मध्ये वाढ केल्याची माहिती मिळाली आहे. स्टेट बँकेचे हे नवे दर रविवारपासून लागू होणार आहेत.

    बँकेने दुसऱ्यांदा एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.स्टेट बँकेने ०.१० टक्क्यांची  म्हणजेच १० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. सगळ्या कर्जांसाठी हा दर लागू होणार आहे.

    एमसीएलआर दर ओव्हरनाइट, एक महिना, तीन महिन्यांसाठी ६.७५ टक्क्यांहून वाढून ६.८५ टक्के झाला आहे. सहा महिन्यांसाठी एमसीएलआर ७.१५ टक्के झाला आहे. त्याशिवाय एक वर्षासाठी एमसीएलआर ७.२० टक्के झाला आहे.

    गृह कर्ज, वाहन कर्ज अथवा वैयक्तिक कर्ज घेतलेल्या स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता हा भार सोसावा लागणार आहे.आधी कर्ज घेतलेल्या ग्राहकांना अधिक इएमआय भरावा लागणार आहे. स्टेट बँकेने एप्रिल महिन्यातही कर्जाच्या दरात वाढ केली होती. वर्ष २०१९ नंतर आतापर्यंत गृह कर्जाच्या लेंडिंग रेट्समध्ये ४० बेसिस पॉईटंची वाढ झाली आहे.

    रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर खासगी आणि सरकारी बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. त्याच्या परिणामी आता कर्ज महागली आहेत.