share market up

बीएसई सेन्सेक्स २५३ अंकांच्या वाढीसह ५९ हजार ८५९ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी ८० अंकांनी वाढून उघडला. त्यामुळं आठवड्याच्या शेवटच्या दिवस भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी (Investors) काहीसा दिलासादायक ठरला आहे.

मुंबई : आठवड्याभरात भारतीय तसेच मुंबई शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण दिसून आल्यानंतर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात थोडी आशा दिसून आली. आज मुंबई सेन्सेक्समध्ये (BSE) 253 अंकांची वाढ दिसून आली.  बाजारात गेल्या चार दिवसांच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आणि आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारतीय शेअर मार्केट तेजीसह खुला झाला. बीएसई सेन्सेक्स २५३ अंकांच्या वाढीसह ५९ हजार ८५९ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी ८० अंकांनी वाढून उघडला. त्यामुळं आठवड्याच्या शेवटच्या दिवस भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी (Investors) काहीसा दिलासादायक ठरला आहे.

अमेरिकन शेअर बाजाराचा परिणाम आशियाई बाजारावर…

गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार तेजीत क्लोज झाला. त्यामुळे आशियाई बाजारांमध्ये तेजीचा कल दिसून येत आहे आणि याचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसून आला आहे. जगातील बाजारातील पाठिंब्यामुळे आज भारतीय मार्केटही तेजीत सुरु झाले आहे. मागील चार दिवसांपासून ते ठवड्याभरात भारतीय तसेच मुंबई शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण दिसून आल्यानंतर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात थोडी आशा दिसून आली. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोणते शेअर्स वधारले?

अॅक्सिस बँक ०.६३ टक्के

बजाज फायनान्स ०.६२ टक्के

कोटक महिंद्रा ०.९३ टक्के

इन्फोसिस ०.८८ टक्के

एनटीपीसी ०.८८ टक्के

इंडसइंड बँक १.३३ टक्के

एसबीआय १.२३ टक्के

बजाज फिनसर्व्ह १.१८ टक्के

भारती एअरटेल ०.७१ टक्केविप्रो ०.६५ टक्के