तुमच्या बँक अकाऊंटमध्ये एक लाखांपेक्षा जास्त पैसे आहेत का? तुम्ही कुठे आणि किती कॅश वापरली? इन्कमटॅक्सचा कडक वॉच

अतिरिक्त रोखीच्या व्यवहारांवर कर विभागाची नजर असते. त्यामुळे विहित मर्यादेपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार करू नका. असे केल्यास प्राप्तिकर विभागाच्या नोटीसला सामोरे जावे लागू शकते(Tax notice for excessive cash transactions).

    मुंबई : अतिरिक्त रोखीच्या व्यवहारांवर कर विभागाची नजर असते. त्यामुळे विहित मर्यादेपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार करू नका. असे केल्यास प्राप्तिकर विभागाच्या नोटीसला सामोरे जावे लागू शकते(Tax notice for excessive cash transactions).

    30 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता रोखीने खरेदी केली किंवा विकली, तर तुम्ही त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यावी, अन्यथा विभाग तुम्हाला निधीचा स्रोत विचारू शकतो. बचत खात्यात रोख ठेवीची मर्यादा 1 लाख रुपये आणि चालू खात्यासाठी 5 लाख रुपये आहे.

    यापेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास तुम्हाला आयकर नोटीस मिळू शकते. तुम्ही क्रेडिट कार्डवर 1 लाख रुपयांचे एकरकमी बिल रोख स्वरूपात जमा केले, तर प्राप्तिकर विभाग तुम्हाला नोटीस देऊन विचारेल.

    एका आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड, डिबेंचर्स किंवा सिक्युरिटीजच्या 10 लाखांपेक्षा जास्त खरेदी आणि विक्रीसाठी कर सूचना प्राप्त होऊ शकतात. एका वर्षात मुदत ठेवीमध्ये (एफडी) 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर प्राप्तिकर विभाग तुमची चौकशी करू शकतो.