सोने-चांदीच्या दरात आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण; जाणून घ्या काय आहेत आजचे भाव?

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

    मुंबई : मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात १६०० रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाल्याचे पहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पहायला मिळले आहे. तर चांदीच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीसाठी आता ६५,००० रुपये मोजावे लागणार आहेत.

    मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

    दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अलिकडच्या काळात सोन्याच्या दरात झालेली घसरण पाहता येत्या काळातही थोड्याफार प्रमाणात दर घटण्याचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या दरांनी प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता.