2021 मधील खरेदीचे स्वरूप : भारतीयांनी ‘मिड-वीक शॉपिंग’ची केलेली धमाल

भारतातील किरकोळ उद्योग (Retail Business In India) जसजसा विकसित होत आहे, तसतशी किंमतींबाबत सजग असलेल्या ऑनलाइन खरेदीदारांची वाढती संख्या भारतीय ई-कॉमर्स (E-Commerce) च्या लँडस्केपला आकार देत आहे.

  • ‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत सुरूच राहिल्यामुळे ब्लूटूथ हेडफोन, चॉपर्स आणि पीलर्स यांच्या खरेदीचे प्रमाण सर्वाधिक
  • ‘मीशो’वर खरेदी करण्यासाठी बुधवार हा सर्वाधिक पसंतीचा दिवस
  • ‘मीशो’वरील विक्रेत्यांनी ‘शून्य टक्के विक्रेता कमिशन मॉडेल’द्वारे दोन अब्ज रुपयांहून अधिक रकमेची साधली बचत
  • ‘मीशो’च्या नवीन वापरकर्त्यांपैकी 71 टक्केजण मलकानगिरी, बैकुंठपूर, मुन्नार, मानकाचार, खलारी, लालगंज आणि महुआ यांसारख्या टियर-3 शहरांतील रहिवासी

बंगळुरू : मीशो (meesho) या भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ‘इंटरनेट कॉमर्स प्लॅटफॉर्म’ने आपल्या व्यवसायामध्ये परिवर्तन घडवून आणले असून प्रगतीचे अनेक नवीन टप्पे गाठले आहेत. देशातील सर्वात कमी सेवा असलेल्या भागांमध्ये या कंपनीने खोलवर प्रवेश केला आहे. या उद्योगात प्रथमच सादर होणारे ‘शून्य टक्के विक्रेता कमिशन मॉडेल’ सादर करण्यापासून ते सुमारे 1 कोटी 70 लाख उद्योजकांना सक्षम करण्यापर्यंत प्रगती करीत, या कंपनीने अधिकाधिक एमएसएमई (MSME) उद्योगांना व देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार (Online Transactions) करण्यास उद्युक्त केले आहे. त्यामुळे हा देशातील संभाव्य कोट्यवधी युजर्सचा प्राधान्याचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनला आहे.

भारतातील किरकोळ उद्योग (Retail Business In India) जसजसा विकसित होत आहे, तसतशी किंमतींबाबत सजग असलेल्या ऑनलाइन खरेदीदारांची वाढती संख्या भारतीय ई-कॉमर्स (E-Commerce) च्या लँडस्केपला आकार देत आहे. या वर्षी ‘मीशो’वर भारतीय नागरिकांनी कसा व्यवहार केला, ते नमूद करणारे काही प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :

ब्लूटूथ हेडफोन, चॉपर्स आणि पीलर्स यांची खरेदी अव्वल प्रमाणात

टाळेबंदीमुळे घरातून काम करण्याचे प्रमाण वाढले. सामाजिक संपर्क किंवा बाहेर जेवायला जाणे यांसारख्या गोष्टींना फाटा दिला गेल्याने, भारतीयांनी अनेक गोष्टी स्वतःच्या हाताने करण्याची सवय करून घेतली. 2021 या वर्षभरात 45 लाखांहून अधिक ब्लूटूथ हेडफोन आणि 17 लाख चॉपर्स आणि पीलर्स विकले गेले. या वर्षी विकल्या गेलेल्या अव्वल पाच उत्पादनांमध्ये साड्या, कुर्ती व कुर्ते आणि प्रिंटेड बेडशीट यांचा समावेश आहे.

मध्य-सप्ताहात खरेदी करण्याचा वाढता कल

‘मिडवीक ब्लूज’ या मानसिकतेपासून दूर राहून, भारतीयांनी सर्वाधिक खरेदी बुधवारच्या दिवशी केली आहे. यात महिलांचा सहभाग जास्त असल्याचे दिसून आले. पुरुषांनी रविवारी खरेदी करण्यास प्राधान्य दिले. त्याचबरोबर, दुपारच्या भोजनानंतर जास्त आळस येतो, या संकल्पनेवर मात करीत आठवडाभर दुपारी 2 ते 3 या वेळेत ‘मीशो’वर खरेदी करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये किचन टॉवेल्स खरेदी करण्याचे प्रमाण जास्त होते, तर गोव्यामध्ये अंतर्वस्त्रांची खरेदी जास्त प्रमाणात झाली. श्रीनगरमध्ये कांद्याचे केसांचे तेल आणि हैदराबादमध्ये मंगळसूत्र यांच्या खरेदीस प्राधान्य मिळाले.

‘मीशो’च्या नवीन वापरकर्त्यांपैकी 71 टक्क्यांहून अधिक जण टियर-3 शहरे व गावांतील रहिवासी

‘मीशो’च्या ‘डायरेक्ट-टू-प्लॅटफॉर्म’ ग्राहकांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 पटींनी वाढ झाली आहे. ओरिसातील मलकानगिरी, छत्तीसगढमधील बैकुंठपूर, केरळमधील मुन्नार, आसाममधील मानकाचार, झारखंडमधील खलारी, उत्तर प्रदेशातील लालगंज आणि बिहारमधील महुआ यांसारख्या टियर-3 शहरांमधून 71 टक्के नवीन वापरकर्ते ‘मीशो’ला मिळाले आहेत.

‘मीशो’च्या विक्रेत्यांनी कमिशनमध्ये साधली 2 अब्ज रुपयांहून अधिक बचत

ग्राहकांना त्यांच्या सर्वात आवडत्या वस्तू परवडणाऱ्या दरांत मिळाव्यात यासाठी विक्रेते प्रयत्न करीत असताना, ‘मीशो’नेदेखील त्यांच्या या प्रयत्नांमध्ये साथ दिली आणि ऑनलाईन व्यवहारांसाठीच्या या उद्योगात प्रथमच सादर होणारी ‘शून्य टक्के कमिशन’ची योजना जुलै 2021मध्ये जाहीर केली. परिणामस्वरूप, विक्रेत्यांनी केवळ 5 महिन्यांत 2 अब्ज रुपयांपेक्षा जास्त बचत केली. यातून 2021 या वर्षभरात ‘मीशो’कडील विक्रेत्यांची संख्या तब्बल 4 लाखांनी वाढली. गुजरात, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील विक्रेत्यांचा यात सर्वात जास्त समावेश होता.

‘मीशो’च्या 1 कोटी 70 लाख उद्योजकांकडून टियर 2+ मार्केटमधील वाढती मागणी पूर्ण

कोट्यवधी वापरकर्त्यांना पुढील काळात ऑनलाइन स्वरुपात जोडून घेण्याकरीता ‘मीशो’चे उद्योजक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ‘मीशो’कडील उद्योजकांमधील 70 टक्क्यांहून अधिक जण दिमापूर, फैजाबाद आणि हल्दवानी यांसारख्या टियर 2+ मार्केटमधील आहेत. ते डिजिटल व्यवहारांमधील तफावत सक्रियतेने भरून काढत आहेत, तसेच कपडे, वैयक्तिक सामान, स्वयंपाकघरातील सामान आणि घरसजावटीच्या वस्तू यांसारख्या जास्त मागणी असलेल्या उत्पादनांच्या पुरवठ्याची पूर्तता करीत आहेत.

मीशो हे जागतिक स्तरावर सर्वाधिक डाउनलोड केलेले ई-कॉमर्स ॲप

‘सेन्सर टॉवर’ या संस्थेच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या ‘नॉन-गेमिंग ॲप्स’मधील पहिल्या 10 ॲप्समध्ये समावेश होणारी, मीशो ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म क्षेत्रातील एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या काळात 8 कोटी 85 लाख इतक्या जणांनी मीशो डाऊनलोड करून घेतले. देशातील इतर सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना ‘मीशो’ने याबाबतीत मागे टाकले आहे.

पुढील वर्षभरात, कंपनी हायपरलोकल व्यवसाय आणि उत्पादने शोधण्याच्या क्षमतेला चालना देणार आहे, तसेच किमतींबद्दल जागरूक असणाऱ्या ग्राहकांसाठी ई-कॉमर्सचे व्यवहार उपलब्ध करून देशातील पुढील कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी पसंतीचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनण्याचे काम सुरू ठेवणार आहे. डिसेंबर 2022पर्यंत दरमहा व्यवहार करणार्‍या 10 कोटी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे आणि 5 कोटी उत्पादने उपलब्ध करण्याचे लक्ष्य ‘मीशो’ने बाळगले आहे.