share market fall

सध्या जगभरात वाढलेली महागाई, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या व्याजदर वाढीचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावून पैसे काढून घेतल्यानं बाजार सुरु होताच दोन्ही निर्देशांकात प्रचंड घसरण झाली. सेन्सेक्स ६०० अंकांनी घसरला असून निफ्टीत २०० अंकांची घसरण झाली आहे.

    मुंबई : या आठवड्यात शेअर बाजारात अस्थिरता पाहयला मिळाली आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा शेअर बाजारात सुरुवातीलाच मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना दोन ते अडीच लाख कोटींचे नुकसान सोसावं लागले. सध्या जगभरात वाढलेली महागाई, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या व्याजदर वाढीचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावून पैसे काढून घेतल्यानं बाजार सुरु होताच दोन्ही निर्देशांकात प्रचंड घसरण झाली. सेन्सेक्स ६०० अंकांनी घसरला असून निफ्टीत २०० अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळं गुंतवणूकदार टेन्शमध्ये आले असून, त्यांना साधारण दोन ते अडीच लाख कोटींचा फटका बसणार आहे.

    दरम्यान, आयटी कंपन्या, मेटल, बँका, वित्तीय संस्था, ऑटो या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. कच्चा तेलाचे भाव तसेच जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव १२२ डॉलरवर गेला आहे. पॉवरग्रीड, डॉ. रेड्डी लॅब, टायटन, भारती एअरटेल, आयटीसी, एसबीआय, एशियन पेंट, रिलायन्स, इंडस्इंड बँक, नेस्ले, महिंद्रा, मारुती, एचसीएल टेक, इन्फोसिसि, टीसीएस, टाटा स्टील, विप्रो हे महत्वाचे शेअर घसरले आहे. आज सकाळी शेअर बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स ६०० अंकांनी घसरला असून, निफ्टीत २०० अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळं गुंतवणूकदार टेन्शमध्ये आले आहेत.