
दि विमेन्स सर्कलविषयी रसिका जोशी -फेणे सांगतात, महिला उद्योजकांना एकत्र आणणे हे आमच्या या दि विमेन्स सर्कलचं प्रमुख ध्येय आहे. महिलांमधली सृजनशीलता, काहीतरी नवीन शिकण्याची उमेद, नेतृत्त्व कौशल्य यांना महत्त्व तर दिले जातेच; पण त्याचबरोबरीने महिलांमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना आम्ही समान संधी सुद्धा देतो.
आजची स्त्री ही स्वतंत्र आहे. तिला स्वत:ची मते आहेत. तिच्यात स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द आहे. त्यामुळेच तर तिच्यात उद्योगिनी म्हणून नावारुपास येण्याचे कसब आहे. पण घर, संसार आणि उद्योग संभाळताना तिच्यातले ‘बाईपण’ कुठेतरी तरी हरवून जाते. तिला तिच्या हौसे मौजेला कुठेतरी मुरड घालावी लागते. तर उद्योजकतेच्या क्षेत्रात वावरताना महिलांना त्यांचे आयुष्य जगण्यासाठी विरंगुळ्याचे चार क्षण मिळावेत,यासाठी ‘दि विमेन्स सर्कल’ (The Women’s Circle) या व्यासपीठाची सुरुवात रसिका जोशी-फेणे यांनी सुरू केली आहे. (Ladies Group)
दि विमेन्स सर्कलविषयी रसिका जोशी -फेणे सांगतात, “महिला उद्योजकांना एकत्र आणणे हे आमच्या या ‘दि विमेन्स सर्कल’चं प्रमुख ध्येय आहे. महिलांमधली सृजनशीलता, काहीतरी नवीन शिकण्याची उमेद, नेतृत्त्व कौशल्य यांना महत्त्व तर दिले जातेच; पण त्याचबरोबरीने महिलांमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना आम्ही समान संधी सुद्धा देतो. जेणेकरून महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्या एकमेकांशी जोडल्या जाव्यात. यासाठी आम्ही ‘दि विमेन्स सर्कल’च्या माध्यमातून एक ऑर्गेनिक प्लॅटफॉर्म प्रदान करण्याचा प्रयत्न करतो!
स्त्रियांमधल्या प्रोत्साहन, प्रामाणिकपणा आणि संयम या प्रमुख गुणांवर ‘दि विमेन्स सर्कल’चा विश्वास आहे. या गुणांच्या आधारावर महिला खूप काही सकारात्मकतेने निर्माण करू शकतात. त्यासाठीच अलीकडेच ‘दि विमेन्स सर्कल’ने TWC या बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते; ज्यात शंभरहून अधिक महिला उद्योजक उपस्थित होत्या. या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच उद्योगक्षेत्रात स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
अनुजा नाडकर्णी- क्रिएटिव्ह आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर, चारुल माहेश्वरी – वर्षातील सर्वोत्कृष्ट मायक्रो बिझनेस, शिवानी चौधरी – यंग अचिव्हर ऑफ द इयर, शिल्पा रिसबुड- इनोव्हेशन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयरमधील पायोनियर, संस्कृती पंड्या – उद्योजक ऑफ द इयर (उत्पादन), रिमा पारीख – उद्योजक (सेवा), डॉ रिद्धी राठी – सीईओ ऑफ द इयर , अशनीत कौर आनंद – एंटरप्राइजिंग स्टार्ट अप ऑफ द इयर आणि सुजाता जोशी, फॅशन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर या उद्योजक महिलांचा सन्मान ‘दि विमेन्स सर्कल’च्या व्यासपीठावर करण्यात आला.
‘दि विमेन्स सर्कल’च्या मंचावर चर्चासत्राचे आयोजन करणात आले होते. या चर्चा सत्रात रश्मी गजरा- संस्थापक, अनमोल बेबी कॅरियर्स, मृण्मयी अवचट – संस्थापक,निकयी फॅशन स्टुडिओ आणि आरती केळकर – संस्थापक, ब्लर फोटोटेनमेंट यांचा सहभाग होता.
‘दि विमेन्स सर्कल’चे महिला उद्योजिकांसाठी असलेले छोटेखानी गेट टुगेदर कस्तुरी दवे, वृषाली काणेकर, अर्चना छाब्रिया, डॉ. अपूर्वा सावंत, राहीला गाझी, नेहा चाफेकर, सुवर्णा जाधव आणि शिखा अग्रवाल या उद्योजक महिला उद्योजकांच्या अथक परिश्रमामुळे यशस्वी झाले.