GST रेट स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल होणार; 12, 18 टक्क्यांचा मिळून एकच 15 टक्क्यांचा स्लॅब 

जीएसटी रेट स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदल सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली राज्यमंत्र्यांची समिती 12 टक्के आणि 18 टक्के स्लॅब एकत्र करून 15 टक्के स्लॅब तयार करण्याची सूचना देऊ शकते(There will be a major change in the GST rate structure; A single 15 per cent slab of 12, 18 per cent).

    दिल्ली : जीएसटी रेट स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदल सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली राज्यमंत्र्यांची समिती 12 टक्के आणि 18 टक्के स्लॅब एकत्र करून 15 टक्के स्लॅब तयार करण्याची सूचना देऊ शकते(There will be a major change in the GST rate structure; A single 15 per cent slab of 12, 18 per cent).

    म्हणजेच पुन्हा 12 आणि 18 टक्के स्लॅब काढून त्यांच्या जागी 15 टक्‍क्‍यांचा स्लॅब येईल. मात्र महागाईच्या चिंतेमुळे किमान 5 टक्के ते 8 टक्के दर वाढवण्याच्या प्रस्तावाबाबत पॅनेल सावध आहे.

    जीसटी काैन्सिलने ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची स्थापना केली होती, जी जीएसटी रेट्सचे सरलीकरण, वर्गीकरणाशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी आणि जीएसटी महसूल वाढवण्यासाठी आपल्या सूचना देईल.

    ही बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये रेट्सबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल आणि शिफारसी केल्या जातील.