Tracevista also hired 300 employees during the global crisis nrvb
ट्रेसव्हिस्टाने जागतिक महासंकटातही ३०० कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले

यात बिझनेस डेव्हलपमेंट सर्विसेस, ह्युमन रीसोर्सेस आणि मार्केटिंग ॲण्ड कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स अशा विविध विषयांचा समावेश होता. या वर्षीच्या कर्मचारी भरतीचे लक्ष्य अद्यापही पूर्ण व्हायचे आहे. २४० ॲनालिस्ट पातळीच्या जागा आधीच भरण्यात आल्या आहेत.

मुंबई : ट्रेस व्हिस्टा, या असेट मॅनेजर्स, आंत्रप्रेन्युअर्स आणि कॉर्पोरेट्सना उच्च दर्जाचा आऊटसोर्स पाठिंबा देणाऱ्या आघाडीच्या कंपनीने आपल्या व्यक्ती प्रथम या तत्वाला अनुसरून मुंबई, पुणे आणि बंगळुरुतील आपल्या डिलिव्हरी सेंटर्ससाठी २०२० मध्ये जवळपास ३०० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. भरती प्रक्रियेत डिजिटायझेशनचा वापर करून नव्या कर्मचाऱ्यांची भरती आणि आणि त्यांना कामावर रुजू करण्याची प्रक्रिया अत्यंत सहजपणे हाताळण्यात आली.

जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर ट्रेसव्हिस्टाने डिलिव्हरी आणि नॉन-डिलिव्हरी अशा दोन्ही स्वरुपाच्या आणि सर्व पदांसाठीच्या विविध विभागातील पदांसाठी कर्मचारीभरती केली. यात बिझनेस डेव्हलपमेंट सर्विसेस, ह्युमन रीसोर्सेस आणि मार्केटिंग ॲण्ड कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स अशा विविध विषयांचा समावेश होता. या वर्षीच्या कर्मचारी भरतीचे लक्ष्य अद्यापही पूर्ण व्हायचे आहे. २४० ॲनालिस्ट पातळीच्या जागा आधीच भरण्यात आल्या आहेत.

आणखी जवळपास १०० पदांवर भरती करून ही कंपनी यंदाच्या कॅलेंडर वर्षाच्या अखेरीपर्यंत आपले कर्मचारीभरतीचे लक्ष्य गाठणार आहे. हे सगळे आकड्यांपुरते मर्यादित नाही तर ट्रेसव्हिस्टाने ‘न्यू नॉर्मल’ परिस्थितीत कर्मचारीभरतीची प्रक्रिया अधिकाधिक समावेशक आणि अत्यंत अस्सल पद्धतीने राबवली आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठीही खास केअरगिव्हर्स लीव्ह आणि वर्क फ्रॉम होम अशी धोरणे राबवण्यात आली.

व्यावसायिक पातळीवर ट्रेसव्हिस्टाने गेल्या तीन वर्षांत आपल्या महसुलात तिप्पट प्रगती केली आहे आणि बिझनेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस आणि डेटा इंटेलिजन्स ग्रुप अशा नव्या सेवाही सुरू केल्या आहेत.

कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांचा अनुभव समृद्ध करण्यासोबतच बहुविध क्षमता असलेल्या आणि पूरक ठरू शकणाऱ्या प्रतिभेला संधी देण्यावर आमचा भर कायम आहे. आम्ही कार्यालये पुन्हा सुरू करू तेव्हा आम्हाला हायब्रिड कार्यपद्धतीचा फायदाच होणार आहे. यामुळे प्रत्येकालाच कामात लवचिकता लाभेल तसेच आम्ही वर्क फ्रॉम होम सेटअपमधून नवे काही शिकत राहू.

सुदीप मिश्रा ट्रेसव्हिस्टाचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक