Union Budget 2023 | सामान्य करदात्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा, करपात्र उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढवली, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेटFebruary, 01 2023

सामान्य करदात्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा, करपात्र उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढवली, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

द्वारा- Sunil Chavan
12:32 PMFeb 01, 2023

या वर्षी 6.5 हजार कोटींचे रिटर्न यावर्षी पूर्ण करण्यात आले आहेत. 45 टक्के रिटर्न्स फक्त 24तासांत पूर्ण करण्यात आले – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
12:31 PMFeb 01, 2023

Budget 2023: नव्या करश्रेणीत मोठे बदल

Budget 2023: नव्या करश्रेणीत मोठे बदल नव्या करश्रेणीत 2.5 लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या ५ पर्यंत कम करण्यात आली आहे. त्यानुसार.. 3 लाखांपर्यंत – कोणताही कर नाही 3 ते 6 लाख – 5 टक्के 6 ते 9 लाख – 10 टक्के 9 ते 12 लाख – 15 टक्के 12 ते 15 लाख – 20 टक्के 15 लाखांहून जास्त – 30 टक्के
12:18 PMFeb 01, 2023

Budget 2023: इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता

बॅटरीवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा. या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता
12:15 PMFeb 01, 2023

Budget 2023: कस्टम ड्युटी दर 21 पासून 13पर्यंत खाली आणण्याचा प्रस्ताव.

कस्टम ड्युटी दर 21 पासून 13 पर्यंत खाली आणण्याचा प्रस्ताव, कम्प्रेस्ड बायोगॅसवर चुकवण्यात आलेल्या जीएसटीवरील कस्टम ड्युटी रद्द करण्याचा प्रस्ताव.
12:12 PMFeb 01, 2023

Budget 2023: मोबाईल फोन स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

देशात मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मोबाईल फोन्सच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव. बॅटरीजवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव.
12:10 PMFeb 01, 2023

Budget 2023 : 2025-26 आधी वित्तीय तूट जीडीपीच्या 4.5 टक्क्यांच्या खाली आणण्याचा मानस

2025-26 आधी वित्तीय तूट जीडीपीच्या 4.5 टक्क्यांच्या खाली आणण्याचा मानस 2025-26 आधी वित्तीय तूट जीडीपीच्या 4.5 टक्क्यांच्या खाली आणण्याचा मानस – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
12:08 PMFeb 01, 2023

Budget 2023: महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटची घोषणा

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल. 2 लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असेल. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
12:05 PMFeb 01, 2023

Budget 2023 केंद्र सरकार प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 लाँच करणार आहे.

तरुणांना आंतरराष्ट्रीय संधींसाठी कुशल बनवण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स स्थापन करण्यात येणार आहेत.
12:03 PMFeb 01, 2023

Budget 2023: क्रेडिट रिव्हॅम्प स्कीमसाठी 9 हजार कोटींची तरतूद!

छोट्या व मध्यम उद्योगांसाठी जाहीर करण्यात आलेली क्रेडिट रिव्हॅम्प स्कीम 1 एप्रिलपासून अंमलात येणार असून त्यासाठी 9 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा 2 लाख कोटींच्या मोफत क्रेडिट गॅरंटी मिळण्यात फायदा होईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
12:01 PMFeb 01, 2023

Budget 2023: पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये 66 टक्क्यांनी वाढ

पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये 66 टक्क्यांनी वाढ
Load More

नवी दिल्ली –  निर्मला सीतारामण आज  5 वा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर अर्थसंकल्प होणार  आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडे देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

View Results

Loading ... Loading ...
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.