Paytm Money कडून मार्जिन प्लेज वैशिष्ट्याचे अनावरण

विविध प्रकारचे समभाग धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना निधीच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे विविध ट्रेडिंग संधी मिळत नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी Paytm Money ने मार्जिन प्लेज वैशिष्ट्य आणले आहे. Margin Pledge ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यात वापरकर्ते ब्रोकरकडे एका तारण मार्जिनच्या बदल्यात आपले समभाग तारण ठेवू शकतात.

  • युजर्सना आपल्या अस्तित्त्वातील स्टॉक्सचा वापर करून नवीन व्यापाराद्वारे आपला पोर्टफोलिओ वाढविण्यास मदत
  • अवघ्या काही क्लिक्समध्ये एका तारण मार्जिनच्या बदल्यात आपले शेअर ब्रोकरला देणे शक्य होणारः मार्जिन व्यापाराच्या कालावधीत ३० मिनिटांत मिळणार
  • तारण ठेवल्यानंतर मिळणारे मार्जिन रोख विभागात इंट्राडे व्यापार, फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी देणे शक्य होणार
  • समभाग तारण ठेवल्याच्या संपूर्ण कालावधीत वापरकर्त्याच्या डिमॅट खात्यात राहणार आणि वापरकर्त्यांना सर्व कॉर्पोरेट कार्ये करता येणार
  • तारण शुल्क आणि या वैशिष्ट्यातून वाढलेले व्यवहार यांच्यामुळे पेटीएम मनीसाठी अधिक महसूल मिळू शकतो

मुंबई : भारताच्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीच्या आघाडीच्या डिजिटल पर्यावरण असलेल्या Paytm ने आपल्या पूर्णपणे मालकीच्या Paytm Money ने मार्जिन प्लेज (Margin Pledge) वैशिष्ट्याचे अनावरण केल्याची घोषणा केली. या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना आपले अस्तित्त्वातील समभाग तारण मार्जिनच्या बदल्यात देणे शक्य होईल. त्याचा वापर रोख विभागात, फ्युचर्स आणि ऑप्शन्स रायटिंगमध्ये इंट्रा डे व्यापारासाठी करता येईल.

विविध प्रकारचे समभाग धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना निधीच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे विविध ट्रेडिंग संधी मिळत नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी Paytm Money ने मार्जिन प्लेज वैशिष्ट्य आणले आहे. Margin Pledge ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यात वापरकर्ते ब्रोकरकडे एका तारण मार्जिनच्या बदल्यात आपले समभाग तारण ठेवू शकतात.

हे उदाहरणासह समजून घेण्यासाठी आपण एक गुंतवणूकदार गृहित धरूया, ज्याच्याकडे २,००,००० रूपयांचे समभाग आहेत. आता एक व्यापाराची संधी येते परंतु त्याच्याकडे निधी नसल्यामुळे गुंतवणूकदाराला ती घेता येत नाही. परंतु आता वापरकर्त्याला आपले समभाग ब्रोकरकडे तारण ठेवता येतील. ब्रोकर समभागांच्या एकूण मूल्यातून सुमारे २० टक्के कापून घेईल. उदा. ४०,००० रूपये आणि उर्वरित १,६०,००० रूपयांचे मूल्य एक तारण मार्जिन म्हणून ग्राहकाला देईल आणि त्याचा वापर विविध व्यापारी संधींसाठी करता येईल.

Paytm Money ने तारण ठेवणे आणि काढणे ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे हे फक्त काही क्लिक्सवर होऊ शकते. व्यापाराच्या कालावधीत तारण फक्त ३० मिनिटांत मिळते आणि तारण रिअल टाइममध्ये मोजले जाते. तारण ठेवलेले समभाग वापरकर्त्याच्या डिमॅट खात्यात राहतात. ते सर्व कॉर्पोरेट कार्यांसाठी उपलब्ध असतात आणि ते थेटही विकता येतात.

एफअँडओ आणि इंट्रा डे व्यापारी हे Paytm Money साठी महसुलाचे प्रमुख स्त्रोत आहेत. या ट्रेडर्सना विविध ट्रेडिंगच्या संधींचा फायदा घेण्यासाठी अनेकदा आर्थिक मदतीची गरज भासते. मार्जिन कोलॅटरल वैशिष्ट्यामुळे या व्यापाऱ्यांसाठी हे व्यासपीठ अधिक आकर्षक होईल आणि त्यांना आपले ट्रेडिंग कार्य वाढवता येईल. १० रूपये अधिक जीएसटी प्रति आयएसआयएन इतके किमान मूल्य प्रत्येक तारण विनंतीवर आणि तारण काढून घेण्याच्या विनंतीवर आकारले जाईल. त्यामुळे मार्जिन प्लेज वैशिष्ट्यामध्ये Paytm Money साठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात महसूल वाढवण्याची क्षमता आहे.
Paytm Money चे मुख्य कार्यकारी अधिकारी वरूण श्रीधर म्हणाले की, “Paytm Money मध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर वापरकर्ता अनुभव सातत्यपूर्ण पद्धतीने वाढवण्यासाठी आणि वापरकर्त्यांना सर्व संधी देण्यासाठी केला आहे. मार्जिन प्लेज वैशिष्ट्य आल्यामुळे गुंतवणूकदारांना नवीन ट्रेडिंग संधींचा फायदा घेण्यासाठी आपल्या अस्तित्त्वातील पोर्टफोलिओचा वापर करता येईल. आम्ही हे वैशिष्ट्य अशा प्रकारे तयार केले आहे, जेणेकरून वापरकर्ते संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही क्लिक्समध्ये पूर्ण करू शकतात आणि त्यांचा ट्रेडिंग अनुभव सुलभ करू शकतात.”

हे वैशिष्ट्य निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि ते जास्तीत-जास्त वापरकर्त्यांना दिले जाईल. हे वैशिष्ट्य अँड्रॉइड आणि वेबसाइटवर सध्या उपलब्ध असून लवकरच ते आयओएसवरही उपलब्ध होईल.