वारी एनर्जीस ला USD 2.37 अब्ज मूल्याच्या नवीन ऑर्डर मिळाल्या

वारी कडे सध्या 4 GW PV मॉड्यूल उत्पादन क्षमता आहे आणि डिसेंबर २०२२ पर्यंत आणखी 5 GW जोडण्याची योजना आहे. 4 GW सौर सेल उत्पादन क्षमता मार्च २०२३ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

  • भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून एकूण USD 2.37 अब्ज मूल्याच्या मिळाल्या नवीन ऑर्डर
  • भारतातील आघाडीच्या सौर पॅनेल उत्पादक

मुंबई: फोटो-व्होल्टेइक (PV) मॉड्यूल निर्मितीवर लक्ष केंद्रित करणार्‍या भारतातील सौरऊर्जा उद्योगातील प्रमुख खेळाडूंपैकी एक असलेल्या वारी एनर्जीस लिमिटेड (Wari Energies Ltd) ने उच्च कार्यक्षमतेच्या 540Wp आणि 600Wp बायफेशियल सौर पॅनल्सचा पुरवठा करण्यासाठी भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून USD 2.37 अब्ज मूल्याच्या नवीन ऑर्डर मिळवल्या आहेत. M10 आणि M12 सेल वापरून हे पॅनल्स वारीच्या उत्पादन सुविधेत तयार केले जातील.

वारी कडे सध्या 4 GW PV मॉड्यूल उत्पादन क्षमता आहे आणि डिसेंबर २०२२ पर्यंत आणखी 5 GW जोडण्याची योजना आहे. 4 GW सौर सेल उत्पादन क्षमता मार्च २०२३ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

हितेश दोशी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, वारी एनर्जी लिमिटेड, म्हणाले, “ह्या ऑर्डर्स भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी सुसंगत आहेत आणि रोजगाराच्या शेकडो संधी निर्माण करून USD २ अब्ज पेक्षा जास्त परकीय चलन आणतील. या ऑर्डर्समुळे आम्ही आमच्या ग्राहकांमध्ये विविधता येईल आणि नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करून आमची बाजारातील स्थिती मजबूत करण्यास सक्षम करेल. संपूर्ण वारी कुटुंबासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे की उच्च दर्जाचे आणि उच्च कार्यक्षमतेचे सोलर पीव्ही मॉड्युल प्रदान करण्याच्या आमच्या सतत प्रयत्नास ग्राहक जागतिक स्तरावर स्वीकारत आहेत.”

वारी द्वारे उत्पादित जागतिक मानकांची पुष्टी करणारे सौर मॉड्यूल १९ देशांमध्ये वितरित केले गेले आहेत. वारी एनर्जीस ला २०१८, २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये ब्लूमबर्ग न्यू एनर्जी फायनान्स (BNEF) कडून सातत्याने “टियर-1 पीव्ही मॉड्यूल निर्माता” रेटिंग मिळाले आहे. वारी ला इकॉनॉमिक टाइम्स कडून सौरउद्योगात “भारताचा सर्वोत्तम ब्रँड” म्हणून मान्यता मिळाली आहे. फोटोव्होल्टेइक चाचणीमध्ये जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त PVEL लॅबने अलीकडेच वारीला त्याच्या २०२२ स्कोअरकार्डमध्ये टॉप परफॉर्मर म्हणून मान्यता दिली आहे.