मुहूर्त ट्रेडिंग इतके लोकप्रिय का आहे?

गुंतवणूकदार इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज व एलएसबी अशा सर्व विभागांमध्ये व्यापार करू शकतात. विद्यमान वर्षाचे प्री-ओपन सत्र सायंकाळी ६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६.०८ वाजता संपेल.

  मुहूर्तचा अर्थ ‘शुभ काळ’ असा होतो. भारतीय परंपरेनुसार दिवाळीच्या पूजेच्या आसपासचा काळ हा आर्थिकदृष्ट्या सर्वात अनुकूल काळ मानला जातो. एनएसई आणि बीएसई सारख्या एक्सचेंजेसनी दरवर्षी मुहूर्त ट्रेडिंगची (Muhurat Trading) वेळ नियुक्त केली असली तरीही ती साधारणपणे दिवाळी पूजेशी (सणाच्या सायंकाळी) संलग्न असते.

  मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) ही एक परंपरा आहे, जी देशभरातील व्यापारी ६० वर्षांहून अधिक काळ जोपासत आहेत. समृद्धी मिळविण्यासाठी आणि फलदायी गुंतवणूक करण्यासाठी व्यापारी बाजारात व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. ही परंपरा फक्त भारतीय बाजारपेठांसाठीच आहे.

  एंजल वनचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी सांगतात की, अशी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक सणाचा उत्साह आहे, ज्यामुळेच मुहूर्त ट्रेडिंग लोकप्रिय ठरली आहे. भारतीय समाजातील अनेक संस्कृती आणि निष्ठेसह नवीन आर्थिक गुंतवणूक सुरू करण्यासाठी दिवाळी हा सर्वोत्तम काळ आहे असा एक सामान्य समज आहे. म्हणूनच गुंतवणूकदार आणि व्यापारी मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी टोकन गुंतवणूक करण्यासाठी या शुभ मुहूर्ताचा वापर करतात.

  मुहूर्त ट्रेडिंग २०२२ (Muhurat Trading): गुंतवणूकदार इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज व एलएसबी अशा सर्व विभागांमध्ये व्यापार करू शकतात. विद्यमान वर्षाचे प्री-ओपन सत्र सायंकाळी ६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६.०८ वाजता संपेल. तसेच मुहूर्त ट्रेडिंग सत्रावरी जुळणा-या वेळा सायंकाळी ६.०८ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत असतील. कॉल लिलावामधील व्यापार बदल सायंकाळी ७.४५ वाजता संपेल.

  या काळात केले जाणारे सर्व व्यवहार सेटलमेंटच्या जबाबदाऱ्यांमध्ये दायित्व होतील, हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

  मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान काय करावे: एक तासाच्या ट्रेडिंग (Muhurat Trading) कालावधीत गुंतवणूकदारांनी काय करावे आणि काय करू नये याची कोणतीही यादी नाही. शेवटी संपूर्ण व्यवहाराचा उद्देश लोकांच्या श्रद्धा आणि भावनांवर आधारित आहे. पण अनेकदा दीर्घकालीन गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि या कालावधीत टोकन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. हा कालावधी शुभ मानला जात असल्याने शेअर बाजारात आपला प्रवास सुरू करू इच्छिणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांना याचा मानसिक फायदा होतो.

  ऐतिहासिकदृष्ट्या या कालावधीने तेजीचा कल दर्शविला आहे. जवळपास ८० टक्के वेळा एक तासाचा ट्रेडिंग (Muhurat Trading) कालावधी पूर्ण केल्यानंतर बाजाराला हिरव्या रंगांचे चिन्ह मिळाले आहे. याचे श्रेय प्रामुख्याने बाजाराच्या सकारात्मक भावना आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेला दिले जाऊ शकते.

  मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान टाळावयाच्या गोष्टी: गुंतवणूकदार शुभ कालावधीत ट्रेडिंग (Muhurat Trading) व गुंतवणूकीसाठी उत्सुक असल्याने मुहूर्त ट्रेडिंग दरम्यानचे ट्रेंड शेअर बाजाराच्या दीर्घकालीन कामगिरीला दाखवू शकत नसल्यामुळे यामध्ये अधिक उत्साहित न होणे गरजेचे आहे. त्यामुळे, अविचारी गुंतवणूक करणे आणि एका तासाच्या ट्रेंडवर आधारित एफअॅण्डओवर लक्ष केंद्रित करणे टाळले पाहिजे. याव्यतिरिक्त, त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्टॉक्स व स्क्रिप्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू नये.

  सारांश: मुहूर्त ट्रेडिंगचे (Muhurat Trading) वेगळेपण भारतीय शेअर बाजारांपुरते मर्यादित आहे. त्यामुळे गुंतवणूकदार नेहमी या परंपरेचा भाग असण्याबद्दल उत्सुक असतात. ही एक जुनी परंपरा आहे, जी एक्सचेंजेस आणि गुंतवणूकदार साजरी करतात. सणासुदीच्या काळात एक्सचेंजेसने आधीच ठरवलेल्या ट्रेडिंगच्या शुभ कालावधीत काही गुंतवणूक करणे नेहमीच स्मार्ट असते. पण गुंतवणूकदाराने बाजारातील मुलभूत ट्रेंड्सची जाणीव ठेवणे आणि मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान अविचारी निर्णय घेण्याचे टाळणे देखील महत्त्वाचे आहे.