तुमची वस्तू आता लवकरात लवकर येणार घरी; अमेझॉन आणि रेल्वेमध्ये करार

    ई-कॉमर्स (ecom) कंपनी Amazon India ने ११० हून अधिक ‘इंटरसिटी’ (Intercity) मार्गांवर ग्राहकांपर्यंत (customers) आपला माल पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेशी हातमिळवणी केली आहे. या हातमिळवणीचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

    कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक ते दोन दिवसांत ग्राहकांना (customers)त्यांच्या वस्तूंची डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी हा करार केला आहे. बऱ्याचदा ग्राहकांच्या तक्रारी असतात की त्यांना त्यांची वस्तू वेळेवर मिळत नाही, यावर तोडगा म्हणून हा उपाय काढलेला आहे.

    आता ते ११९ हून अधिक इंटरसिटी मार्गांवर रेल्वेसोबत (Railway)  काम (work)करत आहे. रेल्वे (Railway) आणि अमेझॉनने (Amazon) २०१९ मध्ये एकत्र काम करण्यास सुरुवात केली होती. मग आता तुम्हाला मिळणार तुमच्या वस्तू सुपर फास्ट. कंपनीने २०१९ मध्ये भारतीय रेल्वेसोबत (Indian Railways)काम करण्यास सुरुवात केली. देशाच्या मध्यवर्ती भागातील ग्राहकांना एक ते दोन दिवसांत डिलिव्हरीचे (Delivery) आश्वासन कंपनीने पूर्ण करण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.